Friday, 10 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 12 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 14 जूलै रोजी धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसा दिनांक 10 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 12 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 14 जूलै रोजी धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 10 ते 16 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत जास्त तर दिनांक 17 ते 23 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचिंत जास्त राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयातील जालना जिल्हयातील परतूर तालूक्यातील (जामसमर्थ) : छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील सिल्लोड तालूक्यातील (अजंठा) गंगापूर तालूक्यातील (वाळूंज) सोयगाव तालूक्यातील (बनोती) इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.

संदेश : शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या सोयाबीन पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

खरीप ज्वारी  पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या खरीप ज्वारी पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जुलैच्या पहिल्या आठवडयानंतर खरीप ज्वारी हे पिक घेऊ नये.

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या बाजरी पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. बाजरी  पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच रासायनिक व्यवस्थापनकरिता क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के 200 मिली प्रति एकर  फवारावे.

हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फुलधारणा व फळधारणा अवस्थेत असल्यामूळे, पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व कोणत्याही किटकनाशकाची फवारणी करू नये. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

मृग बहार डाळींब बागेत फुलधारणा व फळधारणेच्या अवस्थेत असल्यामूळे, पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व बागेत रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता 1 % बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाउला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला  पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व  अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल  पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व  अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

पशुधन व्यवस्थापन

ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक29/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 10.07.2026


Tuesday, 7 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 07 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर परभणी जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात दिनांक 07 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 08 ते 11 जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

 



हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 07 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर परभणी जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात दिनांक 07 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 08 ते 11 जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 10 ते 16 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयातील परभणी जिल्हयातील : पाथरी तालूक्यातील (हदगाव) ; हिंगोली जिल्हयातील सेनगाव तालूक्यातील (पानकन्हेरगाव ; नांदेड  जिल्हयातील भोकर तालूक्यातील (मातूर, किन्नी) अर्धापूर तालूक्यातील (माळेगाव), नायगाव तालूक्यातील (नायगाव) ; जालना जिल्हयातील अंबड तालूक्यातील (सुखापूरी) घनसावंगी तालूक्यातील (अंतरवली, रांजणी) भोकरधन तालूक्यातील (सिपोरा, केदारखेडा) जाफ्राबाद तालूक्यातील (जाफ्राबाद) ; बीड जिल्हयतील आष्टी तालूक्यातील (टाकळसिंघ, पिंपळा), धारूर तालूक्यातील (मोहखेड, अंजनदोह) ; छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील छत्रपती संभाजी नगर तालूक्यातील (चिखलठाण, शेकटा) वैजापूर तालुक्यातील (लोणी, नागामंथन, बकतारा) खुलताबाद तालूक्यातील (बाजार) इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकरी बांधवांनी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.

संदेश : शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

जमिनीत ओलावा व वापसा पाहून कापूस पिकाची लागवड करून घ्यावी. कोरडवाहू बिटी कापूस पिकास 120:60:60 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 48 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. बागायती बिटी कापूस पिकास 150:75:75 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जमिनीत वापसा असताना कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

जमिनीत ओलावा व वापसा पाहून तूर पिकाची पेरणी करून घ्यावी. तूर पिकास 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या तूर पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जमिनीत वापसा असताना तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या मुग/उडीद पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जमिनीत वापसा असताना मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या भूईमूग पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

जमिनीत ओलावा व वापसा पाहून मका पिकाची पेरणी करून घ्यावी. मका पिकास 150:75:75 किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतमात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आं मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा.

ढगाळ वातावरणामूळे आंबा बागेत पर्णगूच्छ रोगाची समस्या लक्षात घेता, पावसाळ्यात आवश्यकतेनूसार दोन ते तीन वेळा रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

द्राक्ष बागेत रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व शेंडा खूड करून घ्यावी. 

लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक28/2026-2027    मंगळवार, दिनांक – 07.07.2026

 

Friday, 3 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड जिल्हयात तर दिनांक 04 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 05 जूलै रोजी हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 03 जूलै रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 04 जूलै रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जूलै रोजी जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 04 जूलै रोजी बहुतांश ठिकाणी तर दिनांक 05 जूलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 06 व 07 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसा दिनांक 03 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड जिल्हयात तर दिनांक 04 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 05 जूलै रोजी हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 03 जूलै रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 04 जूलै रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जूलै रोजी जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 04 जूलै रोजी बहुतांश ठिकाणी तर दिनांक 05 जूलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 06 व 07 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जासत, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा  किंचीत कमी तर दिनांक 10 ते 16 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयातील परभणी जिल्हयातील : परभणी तालूक्यातील (झरी, पिंगळी, परभणी ग्रामीण, टाकळी ‍कुंभकर्ण) गंगाखेड तालूक्यातील (पिंपळदरी), जिंतूर तालूक्यातील (जिंतूर, बामणी, बोरी, दूधगाव, आडगाव, चारठाणा, वाधीधानोरा), पूर्णा तालूक्यातील (कात्नेश्वर, चूडावा), सेलू तालूक्यातील (सेलू, देऊळगाव, चिखलठाणा, मोरेगाव), सोनपेठ तालूक्यातील (वडगाव), मानवत तालूक्यातील (मानवत, कोल्हा, ताडबोरगाव)

हिंगोली जिल्हयातील हिंगोली तालूक्यातील (हिंगोली, नरशी, सिरसम, बासंबा, माळहिवरा,‍ डिग्रस, खंबाळा) कळमनूरी तालूक्यातील (वाकोडी, नांदापूर, डोंगरकडा, वारंगा, कळमनूरी) औंढा तालूक्यतील (औंढा, जवळा बाजार, येहळेगाव, साळणा) सेनगाव तालूक्यातील (गोरेगाव), वसमत तालूक्यातील (अंबा, टेंभूर्णी, कुरूंदा)

लातूर जिल्हयतील लातूर तालूक्यातील (तांदूळजा, मुरुड) अहमदपूर तालूक्यातील (अहमदपूर, हडोळती) उदगीर तालूक्यातील (उदगीर, वढवाण, हेर) रेणापूर तालूक्यातील (पानगाव, कारेपूर) जळकोट तालूक्यातील (जळकोट, घोनसी)

नांदेड  जिल्हयातील बिलोली तालूक्यातील (सगरोळी, कुंडलवाडी, अदमपूर) मूखेड तालूक्यातील (मूखेड, जाम, येवती, चांडोला, बऱ्हाळी, मुक्रामाबाद) कंधार तालूक्यातील (कंधार, कूरूळा, फुलवळ, पेठवडज, बारूळ, डिग्रस बुद्रुक, उस्माननगर) भोकर तालूक्यातील (भोकर) देगलूर तालूक्यातील (शहापूर) किनवट तालूक्यातील (‍किनवट, बोधाडी, इसापूर, मांडवा, देहेली, सिंदगी, उमरी बाजार) मुदखेड तालूक्यातील (मुदखेड, मुगट, बारड) माहूर तालूक्यातील (माहूर, वानोला, सिंदखेड, वाई) धर्माबाद तालूक्यातील (जारीकोट, सिरजखेड) उमरी तालूक्यातील (धानोरा, गोळेगाव) अर्धापूर तालूक्यातील (अर्धापूर, दाभाड), नायगाव तालूक्यातील (मांजरम), नांदेड तालूकयातील (नांदेड ग्रामीण, तरोडा, नाळेश्वर), लोहा तालूक्यातील (लोहा, कळंबर), हदगाव तालूक्यातील (तळणी, मंठा, पिंपळखेड, आष्टी), हिमायतनगर तालूकयातील (हिमायतनगर, सरसम)

जालना जिल्हयातील जालना तालूक्यातील (जालना शहर, जालना ग्रामीण, वांगरूळ, नेर, शेवली, विरेगाव, रामनगर, पंचनवडगाव) अंबड तालूक्यातील (अंबड, धनगर पिंप्री, रोहिलगड, गोंधी, जामखेड) परतूर तालूक्यातील (परतूर, वातूर, आष्टी, सृष्टी, सातोना) बदनापूर तालूक्यातील (शेळगाव, बावनी, रोशनगाव) घनसावंगी तालूक्यातील (रा, ) मंठा तालूक्यातील (तळणी, ढोकसल, पांगरी) भोकरधन तालूक्यातील (भोकरधन, पिंपळगाव, राजूर, अन्वा, हसनाबाद) जाफ्राबाद तालूक्यातील (महोरा, कुंभारझरी, टेंभूर्णी, वरूड)

बीड जिल्हयतील बीड तालूक्यातील (पाली, मांजरसुंबा, नेकनूर, लिंबागणेश, यालमघाट) पाटोदा तालूक्यातील (पाटोदा, दसखेड, थेरला, अमळनेर) आष्टी तालूक्यातील (धावलवडगाव) माजलगाव तालूक्यातील (गंगामसला) अंबेजोगाई तालूक्यातील (घाटनांदूर, उजनी) केज तालूक्यातील (केज, होळ, चिंचोली माळी, बनसरोळा) परळी तालूक्यातील (धर्मापूरी) शिरूर कासार तालूक्यातील (शिरूर, गोमालवाडा, रायमोह) 

धाराशिव जिल्हयातील धाराशिव तालूक्यातील (धाराशिव ग्रामीण, केसेगाव), तूळजापूर तालूक्यातील (सलगरा, इतकल, मंगरूळ), कळंब तालूक्यातील (मोहा, सिराढोल, गोविंदपूर), वाशी तालूक्यातील (वाशी), परंडा तालूकयातील (असू)

छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील छत्रपती संभाजी नगर तालूक्यातील (उस्मानपूरा, कांचनवाडी, चिट्टे पिंपळगाव, करमाड, लाडसावंगी, काचनेर, पंढरपूर, पिसादेवी, वरूड काझी) पैठण तालूक्यातील (आडूल, बालानगर, नांदर, ढोरकीण, पैठण, विहामांडवा, आप्पेगाव, निळा जळगाव, पिंपळवडी, बीडकीण) गंगापूर तालूक्यातील (गंगापूर, मांजरी, शेंदूरवाडा, हरसूळ, डोणगाव, सिध्दनाथ, गजगाव, जामगाव) वैजापूर तालुक्यातील (वैजापूर, खंडाळा, सिवूर, भोरसळ, गारज, लासूरगाव, महलगाव, लाडगाव, घैगाव, जानेफळ) कन्नड तालूक्यातील (कन्नड, चाकनेर, चिखलठाण, देवगाव, पिसोर, चिंचोली, करंजखेड) खुलताबाद तालूक्यातील (वेरूळ, सुलतानपूर, खूलताबाद)  सिल्लोड तालूक्यतील (सिल्लोड, निल्लोड, गोळेगाव, पाळोद, भार्डी, आमठाणा, बोरगाव, अंबाही, उडनगाव) सोयगाव तालूक्यातील (सोयगाव, सावल्डबरा, बलोती, झारंडी) फुलंब्री तालूक्यातील (फुलंब्री, आळंद, फिरबावडा, वडोदाबाजार, बाबरन) इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

संदेश : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी. पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. दिनांक 07 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो ग्रॅम गंधक खताची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते.

खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी  जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.

बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी जमिनीत 60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते.

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच रासायनिक व्यवस्थापनकरिता क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के 200 मिली प्रति एकर  फवारावे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा.

हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फुलधारणा अवस्थेत असल्यामूळे, पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व ढगाळ वातावरणामूळे बागेत रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. मृग बहार डाळींब बागेत फुलधारणा अवस्थेत असल्यामूळे, पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व ढगाळ वातावरणामूळे बागेत रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक27/2026-2027    शुक्रवार, दिनांक 03.07.2026