▼
Tuesday, 8 October 2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 08 ऑक्टोबर रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तर दिनांक 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 व 12 ऑक्टोबर रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत: ढगा...
Friday, 4 October 2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 04 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 05 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 06 ऑक्टोबर रोजी धाराशिव, बीड व लातूर जिल्हयात तर दिनांक 07 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 08 ऑक्टोबर रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 09 ते 12 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी मध्यम ते मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.सं. ने हळूहळू वाढ होण्याची तर पुढील चोवीस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.सं. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

›
    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल...
Tuesday, 1 October 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 01 ऑक्टोबर रोजी आकाश अंशत: ढगाळ तर दिनांक 02 ते 04 ऑक्टोबर दरम्यान आकाश स्वच्छ राहण्याची तर दिनांक 05 ऑक्टोबर रोजी नांदेड, हिंगोली व धाराशिव जिल्हयात आकाश दूपारनंतर अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 व 05 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही. पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...