▼
Monday, 26 January 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 27, 28 व 31 जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहून दिनांक 27 जानेवारी रोजी छत्रपती सभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तर दिनांक 31 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात ‍तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील एक ते दोन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ तर दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी 2 ते 3 अं.से. ने वाढ तर दिनांक 28 जानेवारी रोजी 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...