Friday, 22 April 2022

दिनांक 22 एप्रिल रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्हयात दिनांक 25 व 26 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे व त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 22 एप्रिल रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची  शक्यता आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्हयात दिनांक 25 व 26 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 एप्रिल ते 3 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.  सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.   कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.  कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. 

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  

 

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

तुती रेशीम उद्योग

रेशीम अळीस दुध्या रोग म्हणून विषाणू जन्य ग्रासरी तर फ्लॅचरी रोग जिवाणू व  विषाणूच्या संयुक्त प्रादूर्भावामुळे होतो. रोगकारक जिवाणू किंवा विषाणू कीटक संगोपन गृहात हळूहळू बळावतात. पहिल्या दुसऱ्या वर्षात यशस्वी पीके निघाल्यानंतर संगोपन गृहातील उर्वरीत काडी कचऱ्याची, मृत अळया, प्लास्टीक चंद्रिकेवरील शिल्लक धागा, वापरात आलेले वर्तमानपत्र इत्यादीची व्यवस्थीत विल्हेवाट लावावी. या वस्तू निर्जंतूक करून कडक उन्हात वाळवून पून्हा वापरता येतील. 2 टक्के ब्लीचींग पावडर व 0.3 टक्के चुना द्रावणात बूडवून ट्रे, प्लास्टीक जाळया आच्छादन उन्हात चांगलेवाळवून पुन्हा वापरता येतील, अन्यथा याच वस्तू पासून रोगाचा फैलाव होतो. उन्हाळयात तापमान 35 अं.ये. च्या वर राहते त्यास 28 सें.ग्रे. ते 30 सें.ग्रे. च्या दरम्यानच ठेवावे.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.   जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी  शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सामुदायिक विज्ञान

कपडयांचा रंग टिकून राहण्याकरीता कपडे पाण्यातून खळबळवितांना शेवटच्या पाण्यात मीठ टाकावे. तर रेशमी कपडे खळबळवितांना लिंबाच्या रसाचा वापर करावा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक07/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक 22.04.2022

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 सप्टेंबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, लातूर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी तर ‍दिनांक 11 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील तीन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...