Friday, 15 May 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 15 मे रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 मे रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी दूपारी/सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 15 मे रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 मे रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी दूपारी/सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 15 ते 21 मे 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सररासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची व दिनांक 22 ते 28 मे 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सररासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात दिनांक 15 ते 18 मे दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यला लक्षात घेता, काढणी केलेल्या पिकाची, फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात काणी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी बूरशीनाशकाची फवारणी करावी किंवा प्रादर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

सध्या हळद उकडणे, वाळवणे ही कामे करून घ्यावीत. हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.

उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या अंबे बहार फळांची काढणी करून घ्यावी. बागेतील वाळलेल्या, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर बोर्डो मिक्सचरची फवारणी करावी. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेत पूर्व तयारी करावी. नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा.

डाळींब बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या अंबे बहार फळांची काढणी करून घ्यावी. बागेतील वाळलेल्या, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर बोर्डो मिक्सचरची फवारणी करावी. मृग बहार व्यवस्थापनासाठी डाळींब बागेत पूर्व तयारी करावी. नविन लागवड केलेल्या व लहान डाळींब झाडांना काठीने आधार द्यावा.

चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. उष्णतेपासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी झाडाला 1 % बोर्डो पेस्ट लावावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता,  जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठ्यातील तापमान कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिज मिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक13/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 15.05.2026

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 12 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 14 जूलै रोजी धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्...