Friday, 14 August 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 16 व 17 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14, 16, 17 व 18 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 16 व 17 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14, 16, 17 व 18 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 14 ते 20 ऑगस्ट 2026 व दिनांक 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकात, बागेत, भाजीपाला व फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50%  400 मिली किंवा इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी व वरील किटकनाशकासोबत दुसरे कुठलेही औषध मिसळुन फवारू नये. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम  किंवा 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.

खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.

बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.

ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघुन फवारावे. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% 60 मिली किंवा ॲसिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी मात्र मित्र किडींची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी एकाच प्रकारच्या किटकनाशकाची वारंवार फवारणी न करता वेगवेगळया कार्यपध्दतीच्या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. हळद पिकाची लागवड करून 30 दिवस झाले असल्यास हळद पिकास 25 किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळद पिकाची लागवड करून 60 दिवस झाले असल्यास 25 किलो नत्रासोबत 00:52:34 15.5 किलो प्रति एकरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी व क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जमिनीतून आळवणी करावी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिन्यातून एकदा अळवणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल्या कंदावर कंदमाशीची मादी अंडी घालते. त्यामुळे उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकावेत व वेळेवर भरणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बाग फुलधारणा व फळधारणेच्या अवव्थेत असल्यामूळे बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत किडीचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून, बागेत किटकनाशकाची व रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

मृग बहार डाळींब बागेत तेल्या रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता 1 % बोर्डो मिश्रणाची व याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झी क्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकास जमिनीत ओलावा बघून खतामात्रा देण्यात यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.

                                           सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक39/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 14.08.2026

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 सप्टेंबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, लातूर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी तर ‍दिनांक 11 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील तीन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...