Tuesday, 25 August 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी बीड, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 27 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 25 व 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24-48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर किंचित वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  दिनांक 25 ऑगस्ट रोजी बीड, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 27 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 25 व 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24-48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर किंचित वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक दिनांक 28 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकात, बागेत, भाजीपाला व फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत.

तूर पिक 45 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या फुटतात.  सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तूर पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.

मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मुग/उडीद पिकात भुरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भूईमूग पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

मका पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या कणसांची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेस लागवड करून तीन महिने झाले असल्यास 50 ग्रॅम नत्र व 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत बोधांना माती लावावी.

आंबा बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत शेंडा खूडून घ्यावा.

सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. सिताफळ बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला ‍पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकास खत मात्रा देण्यात यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. फुल ‍पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 42/2026-2027    मंगळवार, दिनांक – 25.08.2026

 

No comments:

Post a Comment