Monday, 30 December 2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार दिवसात किमान तापमानात 3 ते 4 अं.से. ने कमी होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश :  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. उशीरा पेरणी केलेल्या तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम  किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5%  8 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र 109 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी देऊन आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या हवामानानूसार दूध उत्पादनावरील पशूधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.  थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक79/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 31.12.2024

Friday, 27 December 2024

मराठवाडयात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 27 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. दिनांक 27 डिसेंबर रोजी परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 28 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 27 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. दिनांक 27 डिसेंबर रोजी परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 28 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. ‍‍

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 27 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जासत व दिनांक 03 ते 09 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवडे झाले असल्यास 260 किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामूळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी. प्रति बंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच अंतराने प्रत्येक महीन्यात जमिनीतून क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. हळदीच्या पानावरील ‍ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत. हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

 तुती रेशीम उद्योग

शेडनेट रेशीम किटक संगोपनगृहात स्वच्छता कळीचा मुद्दा आहे. कच्ची जमीन, वाळू, मुरूम असेल तर 100 टक्के निर्जंतुकीकरण होत नाही. जमिनीवर कोबा (सिमेंट, काँक्रेट) किंवा फरशी करून घेणे. शेडनेटच्या आतील चोही बाजूला अर्ध्या फुट खोलीची व एक फुट रूंदीची नाली करून घ्यावी. 2% फॉरमॅलीन हात धूण्यासाठी, नायलॉन नेट, कॉटन जाळी, पॉलीथीन अच्छादन यांना निर्जंतूकीकरण साठी वापरावे. लोखंडी रॅक असतील तर फॉरमॅलीन फवारू नये रॅकला गंज चढतो तशी शिफारस नाही. जिवाणू, विषाणू व बुरशींच्या प्रादूर्भावामुळे रोग बळावतो त्यामूळे ब्लिचिंग पावडर 2 टक्के व 0.3 टक्के चूना द्रावणाने कोष काढणी नंतर शेडनेट गृहात फवारणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या हवामानानूसार दूध उत्पादनावरील पशूधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.  थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक78/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक 27.12.2024

Tuesday, 24 December 2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस हवामान स्वच्छ व कोरडे तर दिनांक 26 ते 28 डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 26 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता आहे तर परभणी व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 27 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश :  पाऊसाचा अंदाज पाहता काढणी केलेलय पीकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम  किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5%  8 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र 109 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी देऊन आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.द्राक्ष बागेत 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक77/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 24.12.2024

Thursday, 19 December 2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे तर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी बीड, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील तीन दिवसात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. ‍‍

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 20 ते 26 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 27 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामूळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामूळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी. प्रति बंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच अंतराने प्रत्येक महीन्यात जमिनीतून क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. हळदीच्या पानावरील ‍ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत. हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

 तुती रेशीम उद्योग

शेडनेट रेशीम किटक संगोपनगृहात स्वच्छता कळीचा मुद्दा आहे. कच्ची जमीन, वाळू, मुरूम असेल तर 100 टक्के निर्जंतुकीकरण होत नाही. जमिनीवर कोबा (सिमेंट, काँक्रेट) किंवा फरशी करून घेणे. शेडनेटच्या आतील चोही बाजूला अर्ध्या फुट खोलीची व एक फुट रूंदीची नाली करून घ्यावी. 2% फॉरमॅलीन हात धूण्यासाठी, नायलॉन नेट, कॉटन जाळी, पॉलीथीन अच्छादन यांना निर्जंतूकीकरण साठी वापरावे. लोखंडी रॅक असतील तर फॉरमॅलीन फवारू नये रॅकला गंज चढतो तशी शिफारस नाही. जिवाणू, विषाणू व बुरशींच्या प्रादूर्भावामुळे रोग बळावतो त्यामूळे ब्लिचिंग पावडर 2 टक्के व 0.3 टक्के चूना द्रावणाने कोष काढणी नंतर शेडनेट गृहात फवारणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या हवामानानूसार दूध उत्पादनावरील पशूधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.  थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक76/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक 20.12.2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 02 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. दिनांक 01 व 03 एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्हयात ; दिनांक 02 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 03 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात ; दिनांक 04 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...