Tuesday 31 August 2021

मराठवाडा विभागाकरिता हवामान अंदाज व कृषि सल्ला दिनांक 05 ते 11 सप्टेंबर, 2021

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 ऑगस्ट रोजी  औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली  जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात उस्मानाबाद जिल्हयात खूप हलका ते हलका ; जालना, बीड, लातूर जिल्हयात खूप हलका ते मध्यम ; औरंगाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ढगाळ वातावरणामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल 5% 30 मिली  किंवा स्प‍िनेटोरम 11.7% 8  मिली  किंवा बूप्रोफेंझीन 25% 20  मिली किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड  दिल्यास फवारणी करावी.  कापूस पिकात जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव  दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% 25 ग्रॅम + स्ट्रेपटोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड  दिल्यास फवारणी करावी. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात आकस्मिक मर विकृतीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून द्यावे वापसा येताच कोळपणी व खूरपणी करावी. लवकरात लवकर 1.5  किलो यूरीया + 1.5 किलो पालाश (पोटॅश) + 250 ग्रॅम  कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 150 मिली आळवणी करावी किंवा 1 किलो 13:00:45 + 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 200 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी. कापूस पिकात फुलगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथेलीन ॲसिटीक ॲसिड (एन ए ए ) 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड  दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या मूग पिकाची सुरक्ष‍ित ठिकाणी साठवणूक करावी व पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड  दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून दोन दिवसानंतर पावसाने उघाड  दिल्यास फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिकात मागील आठवडयातील ढगाळ वातावरण, आर्द्रतेमूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.सध्याचे ढगाळ वातावरण, आर्द्रता, पावसामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार द्राक्ष बागेत केवडा (डाउनी मिल्डू) रोगाच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस 4 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून बागेबाहेर काढून द्यावे.

भाजीपाला

मागील आठवडयातील दमट, ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार भाजीपाला पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावीत. मागील दोन दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार फुलपिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी फुलपिकात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरीत चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळाऋतूमध्ये लोखंड सदृश अखाद्य वस्तू पशुधनाकडून खाद्याबरोबर गिळल्या जाते व यामूळे पोटफुगी संभवते याचे निदान करण्यासाठी पशूशल्य्‍चिकीत्साशास्त्र विभाग, पशू चिकीत्सालय संकुल पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय येथे अद्यावत क्ष-किरण तपासणी सुविधा उपलब्ध्‍ करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

सामुदासिक विज्ञान

काम करत असताना अनुभवी व्यक्तीच्या कार्य पध्दतीचे निरीक्षण करत गेल्यास स्वत:ची कार्यपध्दती सुधारण्यास मदत होते.

 

सौजन्‍य -  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक44 / 2021 - 2022    मंगळवार, दिनांक – 31.08.2021

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 44 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 31.08.2021


 

Friday 27 August 2021

दिनांक 29 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 29 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात औरंगाबाद, जालना, हिंगोली जिल्हयात खूप हलका ते मध्यम तर बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्हयात हलका ते मध्यम तसेच लातूर व नांदेड जिल्हयात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या मूग/उडीद पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले पिक पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची,  किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन  पिकावरील उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड  39.35 एससी 3 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 15.8 एससी 3 मिली किंवा थायमिथोक्झाम  12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या उपाययोजनेसाठी सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.   फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात तणांचे नियंत्रण करावे.ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी फळबागेत फळ गळ होऊ नये म्हणून जिब्रॅलिक ॲसिड 50 पीपीएम ची (5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून) पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.मृगबहार धरलेल्या बागेत बूरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बोर्डो मिश्रण 0.5% पावसाने उघाड दिल्यास फवारावे. तेलकट रोग व्यवस्थापनासाठी ब्रोनोपॉल 25 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  चिकू बागेत तणांचे व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी. भाजीपाला पिकातील तणांचे व्यवस्थापन करावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. फुलपिकातील तणांचे व्यवस्थापन करावे.

चारा पिके

चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर 100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी. पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.

सामुदायिक विज्ञान

कामाचे पूर्व नियोजन केल्यास कामातील गोंधळ कमी होऊन ठराविक वेळेत व कमी कष्टात काम पूर्ण होऊ शकते.

 

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक43/ 2021 - 2022     शुक्रवार, दिनांक – 27.08.2021

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 43 / 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक - 27.08.2021


 

Tuesday 24 August 2021

दिनांक 24 ऑगस्ट रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी जिल्हयात खूप हलक्या ते मध्यम तर उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 ऑगस्ट रोजी  मराठवाडयातील सर्व जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी जिल्हयात खूप हलक्या ते मध्यम तर उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात आकस्मिक मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून द्यावे व कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम + युरिया 100 ग्रॅम + म्यूरेट ऑफ पोटॅश 100 ग्रॅम + 10 लिटर पाणी याप्रमाणात द्रावण तयार करून झाडाच्या मूळाशी आळवणी करावी. आठ ते दहा दिवसांनी 2% डीएपी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) याची आळवणी करून पाऊस नसल्यास  लगेच हलके पाणी द्यावे. कापूस पिकात पातेगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलीन ॲसिटीक ॲसिड (एन ए ए ) 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार कापूस पिकावरील  रसशोषण करणाऱ्या किडींचा व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बूप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार उशीरा पेरणी केलेल्या मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावीमागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिकात मागील आठवडयातील ढगाळ वातावरण, आर्द्रतेमूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. बागेतील पिल्ले काढावेत व तण नियंत्रण करावे.आंबा बागेत तणांचे व्यवस्थापन करावे. सध्याचे ढगाळ वातावरण, आर्द्रता, पावसामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार द्राक्ष बागेत केवडा (डाउनी मिल्डू) रोगाच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस 4 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी व शेंडा खूडावा.सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील आठवडयातील दमट, ढगाळ वातावरणामूळे व पूढील पाच दिवसाच्या दमट व ढगाळ वातावरणाच्या अंदाजानूसार टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावीत.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळाऋतूमध्ये लोखंड सदृश अखाद्य वस्तू पशुधनाकडून खाद्याबरोबर गिळल्या जाते व यामूळे पोटफुगी संभवते याचे निदान करण्यासाठी पशूशल्य्‍चिकीत्साशास्त्र विभाग, पशू चिकीत्सालय संकुल पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय येथे अद्यावत क्ष-किरण तपासणी सुविधा उपलब्ध्‍ करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

सामुदासिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक42 / 2021 - 2022    मंगळवार, दिनांक 24.08.2021

 


 

Friday 20 August 2021

दिनांक 20 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूढील पाच दिवसात औरंगाबाद, जालना, बीड, व परभणी जिल्हयात खूप हलका ते मध्यम, उस्मानाबाद जिल्हयात खूप हलका ते हलका, लातूर जिल्हयात हलका ते मध्यम, नांदेड जिल्हयात मध्यम, हिंगोली जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूढील पाच दिवसात औरंगाबाद, जालना, बीड, व परभणी जिल्हयात खूप हलका ते मध्यम, उस्मानाबाद जिल्हयात खूप हलका ते हलका, लातूर जिल्हयात हलका ते मध्यम, नांदेड जिल्हयात मध्यम, हिंगोली जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची,  किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन पिकावर रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 12.60% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.50% झेडसी 2.5 मिली किंवा बीटासायफ्लूथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी. सध्याचे ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामूळे सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी.  खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी.   फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात तणांचे नियंत्रण करावे.ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). सध्याच्या दमट व ढगाळ वातावरणामूळे हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे लिंबूवर्गीय फळपिकात खैऱ्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडावरील रोगग्रस्त फांद्या व पाने काढून नष्ट करावेत व झाडावर कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 30 ग्रॅम + स्ट्रेपटोमायसीन 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ‍मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी.  दूसरी फवारणी तिस दिवसानंतर करावी.सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणमूळे मृगबहार धरलेल्या बागेत बूरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बोर्डो मिश्रण 0.5% पावसाने उघाड दिल्यास फवारावे. तेलकट रोग व्यवस्थापनासाठी ब्रोनोपॉल 25 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी.  चिकू बागेत तणांचे व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी.  सध्याच्या दमट व ढगाळ वातावरणामूळे टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी. 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास व शेतात वापसा असताना फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर 100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी. पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात भूक वाढविणारा आणि अन्नाचे पचन सुलभ करणारा आहार घ्यावा. यासाठी आहारात मीरे, हिंग, सुंठ, लसूण अशा पचनास मदत करणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक41/ 2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 20.08.2021

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 41 / 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक - 20.08.2021


 

Tuesday 17 August 2021

दिनांक 17 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 ऑगस्ट रोजी  औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात सहा किंवा आठ ओळीनंतर जलसंधारण सरी काढावी. ढगाळ वातावरण असल्यामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बूप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम प्रति एकर दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.तूर पिकात प्रत्येक ओळीत जलसंधारण सरी काढावी. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.ढगाळ वातावरण यामुळे मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.ढगाळ वातावरणामूळे भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिकात ढगाळ वातावरण व आर्द्रतेमूळे करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.आंबा बागेत तणांचे व्यवस्थापन करावे. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.सध्याचे ढगाळ वातावरण, आर्द्रता व पावसामूळे द्राक्ष बागेत केवडा (डाउनी मिल्डू) रोगाच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस 4 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

सध्याच्या दमट व ढगाळ वातावरणामूळे टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.

 

फुलशेती

ढगाळ वातावरणामूळे गुलाब फुलपिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळाऋतूमध्ये लोखंड सदृश अखाद्य वस्तू पशुधनाकडून खाद्याबरोबर गिळल्या जाते व यामूळे पोटफुगी संभवते याचे निदान करण्यासाठी पशूशल्य्‍चिकीत्साशास्त्र विभाग, पशू चिकीत्सालय संकुल पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय येथे अद्यावत क्ष-किरण तपासणी सुविधा उपलब्ध्‍ करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता  असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच पाऊस चालू होण्याच्यावेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.

सामुदासिक विज्ञान

पावसाळयात पचनक्रिया मंदावल्याने अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी यासाठी पावसाळयात पचनास हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक40 / 2021 - 2022    मंगळवार, दिनांक – 17.08.2021