Friday 30 December 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 79/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 30.12.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर  किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

मराठवाडयात दिनांक 30 डिसेंबर 2022 ते 05 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर दिनांक 06 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवडे झाले असल्यास 260 किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 15 ग्रॅम 00:00:50 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अंबे बहार धरण्यासाठी मोसंबी बागेस 500:500:500 ग्रॅम व संत्रा बागेस 400:400:400 ग्रॅम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी व बागेस पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी प्रति झाड 300:250:250 ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश खतमात्रा देऊन बागेस पाणी द्यावे. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 100 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 200 ग्रॅम प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

ज्या शेतात मिरची, तंबाखू लागवड केली असेल किंवा भाजीपाला पिकात किटकनाशकाचा वापर केला असेल अशा जमिनीत तुती लागवड करू नये. ज्या जमिनीमध्ये सोयाबीन पिकानंतर तुती लागवड केली असेल अशा जमिनीत कोराझीन सारख्या किटकनाशकाची अगोदर फवारणी केली असेल व रासायनिक खत उदा. युरीया, डिएपी जास्त प्रमाणात दिले असतील तर रेशीम किटकांच्या पोटात तुती पानातून विषबाधा होण्याची शक्यता असते अशा अळ्या मृत पावतात. त्याचबरोबर ज्या जमिनीचा सामु 8.0 किंवा 8.0 च्या वर असेल अशा जमिनीत तुतीची वाढ होत नाही त्या जमिनीत जिप्सम 8 टन/हेक्टर प्रमाणे द्यावे लागेल.

सामुदायिक विज्ञान

दोन टक्के आवळ्याच्या पानाच्या अर्काचा वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ प्रतिबंधित करता येते. आवळ्याच्या पानाच्या अर्कासह 6% सीट्रिक ॲसिड घेऊन सुती कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सुक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा प्रतिबंध कापडाच्या पाच धुण्यानंतर कमी झाल्याचा आढळून आला. आवळ्याच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्टयपूर्ण कपडयांना उदा. अवगुंठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पट्टया यावर केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक79/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 30.12.2022

 

Tuesday 27 December 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 78/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 27.12.2022


 

मराठवाडा विभागामध्ये दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन दिनांक 29 व 30 डिसेंबर रोजी किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाडा विभागामध्ये धुके राहण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये  दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन दिनांक 29 व 30 डिसेंबर रोजी किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाडा विभागामध्ये धुके राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 30 डिसेंबर ते 05 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीती ओलावा कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. उशीरा पेरणी केलेल्या तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या भुईमूग पिकात मावा, फुलकिडे याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास पोटरी येण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. रब्बी सूर्यफूल फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे. गहू पिकास फुटवे फुटण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत. केळी बागेत 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. आंब्याच्या मोहोरावर तूडतूड्यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.   द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट 2022 पासून चालू आहे व त्याची तिव्रता लसीकरणामूळे कमी झाली असली तरीही आजही  नवीन नवीन पशु व वासरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी (1) राहीलेल्या पशुधनास तात्काळ लसीकरण करणे. (2) महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या “माझा गोठा-स्वच्छ गोठा” याची माझ्या गोठ्यामध्ये अमलबजावणी नव्हे तर दैनंदिन स्वच्छता आमलात आणणे. (3) गोचीडाचा प्रादुर्भाव रोखणे. गोचीड या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. (4) लागण झालेल्या पशुचे विलगीकरण-आजारी पशुस ईतर पशुपासून दुर विलगीकरणामध्ये ठेवणे. (5) रोगी पशु असलेला गोठा सोडीयम हायपोक्लोराईट ने निर्जंतुकीकरण करणे हे उपाय सलग चालू ठेवावेत.

सामूदायीक विज्ञान

लोह समृध्द पदार्थ-कुटुंबाच्या दैनंदिन आहारात बदल करून लोहाच्या कमतरतेमूळे उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून विविध पाककृती मदत करतात. आपल्याकडे अनेक हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्या खनिज समृध्द असून या भाज्यांची  विविध पाककृतीमध्ये उपयोग करावा. ताज्या भाज्यांच्या तुलनेत सुकवलेल्या भाज्यांच्या पावडर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वापरातील पालक, कोथिंबीर, शेवग्याची पाने आणि कढीपत्याची पाने सुकवून त्याची पावडर बनवून लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी विविध पाककृतीमध्ये वापरावी.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक78/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 27.12.2022

 

Thursday 22 December 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर  किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 23 ते 29  डिसेंबर 2022 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे तर दिनांक 30 डिसेंबर ते 05 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित कमी झालेले आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 65 किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी बागेस पाणी देणे बंद करावे (बागेस ताण द्यावा). डाळींब बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी जमिनीच्या प्रकारानूसार तिन ते सहा आठवडे बागेस पाणी देणे बंद करावे (बागेस ताण द्यावा). काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

ज्या शेतात मिरची, तंबाखू लागवड केली असेल किंवा भाजीपाला पिकात किटकनाशकाचा वापर केला असेल अशा जमिनीत तुती लागवड करू नये. ज्या जमिनीमध्ये सोयाबीन पिकानंतर तुती लागवड केली असेल अशा जमिनीत कोराझीन सारख्या किटकनाशकाची अगोदर फवारणी केली असेल व रासायनिक खत उदा. युरीया, डिएपी जास्त प्रमाणात दिले असतील तर रेशीम किटकांच्या पोटात तुती पानातून विषबाधा होण्याची शक्यता असते अशा अळ्या मृत पावतात. त्याचबरोबर ज्या जमिनीचा सामु 8.0 किंवा 8.0 च्या वर असेल अशा जमिनीत तुतीची वाढ होत नाही त्या जमिनीत जिप्सम 8 टन/हेक्टर प्रमाणे द्यावे लागेल.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट 2022 पासून चालू आहे व त्याची तिव्रता लसीकरणामूळे कमी झाली असली तरीही आजही  नवीन नवीन पशु व वासरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी (1) राहीलेल्या पशुधनास तात्काळ लसीकरण करणे. (2) महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या “माझा गोठा-स्वच्छ गोठा” याची माझ्या गोठ्यामध्ये अमलबजावणी व दैनंदिन स्वच्छता आमलात आणणे. (3) गोचीडाचा प्रादुर्भाव रोखणे. गोचीड या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. (4) लागण झालेल्या पशुचे विलगीकरण-आजारी पशुस ईतर पशुपासून दुर विलगीकरणामध्ये ठेवणे. (5) रोगी पशु असलेला गोठा सोडीयम हायपोक्लोराईट ने निर्जंतुकीकरण करणे हे उपाय सलग चालू ठेवावेत.

सामुदायिक विज्ञान

सकाळचा नाश्ता एक महत्वाचे जेवण आहे कारण रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळच्या नाशत्यामूळे शरीराला लागणाऱी उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य चांगल्या आरोग्याकरिता आवश्यक आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक77/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 23.12.2022

 

Tuesday 20 December 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 76/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 20.12.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 23 ते 29 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावरील 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. उशीरा पेरणी केलेल्या तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  भुईमूग पिकात मावा, फुलकिडे याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे. गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत. आंब्याच्या मोहोरावर तूडतूड्यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.   द्राक्ष बागेत घडांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्ष घड 20 पिपिएम जिब्रॅलिक ॲसिडच्या द्रावणात बूडवावेत.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट 2022 पासून चालू आहे व त्याची तिव्रता लसीकरणामूळे कमी झाली असली तरीही आजही  नवीन नवीन पशु व वासरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी (1) राहीलेल्या पशुधनास तात्काळ लसीकरण करणे. (2) महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या “माझा गोठा-स्वच्छ गोठा” याची माझ्या गोठ्यामध्ये अमलबजावणी नव्हे तर दैनंदिन स्वच्छता आमलात आणणे. (3) गोचीडाचा प्रादुर्भाव रोखणे. गोचीड या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. (4) लागण झालेल्या पशुचे विलगीकरण-आजारी पशुस ईतर पशुपासून दुर विलगीकरणामध्ये ठेवणे. (5) रोगी पशु असलेला गोठा सोडीयम हायपोक्लोराईट ने निर्जंतुकीकरण करणे हे उपाय सलग चालू ठेवावेत.

सामूदायीक विज्ञान

लोह समृध्द पदार्थ-कुटुंबाच्या दैनंदिन आहारात बदल करून लोहाच्या कमतरतेमूळे उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून विविध पाककृती मदत करतात. आपल्याकडे अनेक हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्या खनिज समृध्द असून या भाज्यांची  विविध पाककृतीमध्ये उपयोग करावा. ताज्या भाज्यांच्या तुलनेत सुकवलेल्या भाज्यांच्या पावडर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वापरातील पालक, कोथिंबीर, शेवग्याची पाने आणि कढीपत्याची पाने सुकवून त्याची पावडर बनवून लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी विविध पाककृतीमध्ये वापरावी.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक76/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 20.12.2022

 

Friday 16 December 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 75/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 16.12.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर  किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

मराठवाडयात दिनांक 16 ते 22 डिसेंबर व दिनांक 23 ते 29 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित वाढलेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 65 किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).  मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.  ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी जमिनीच्या प्रकारानूसार तिन ते सहा आठवडे बागेस पाणी देणे बंद करावे (बागेस ताण द्यावा). काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

 

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

उझी माशीचा संगोपन गृहात प्रादूर्भाव होऊ नये म्हणून संगोपन गृह चोही बाजूने, वरील पत्रे व शेडनेट सील करावे. सर्व प्रथम तुती फांद्या कापून शेतातून सरळ संगोपन गृहात आणण्याचे बंद करावे. पाने साठवण्यासाठी अंधार खोलीची व्यवस्था करावी तेथे फांद्या उभ्या ठेवून पानावरची धूळ स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा फवारा किंवा फॉगर ची व्यवस्था करावी. अंधार खोली तसेच संगोपनगृहातील फवारणी केलेले दूषित पाणी बाहेर निघून जाण्यासाठी चोही बाजूने 22.5 सेंमी X 15 सेंमी रूंदीच्या नालीची व्यवस्था असावी. 100% निर्जंतूकीकरण होण्यासाठी दोन कोषाच्या पिकात 8 दिवसाचे अंतर ठेवणे व त्या काळात 3 ते 4 वेळा आलटून पालटून ब्लिचिंग पावडर 0.2% 200 ग्राम +30 ग्राम चुना पावडर पाण्यासोबत मिश्रण करून फवारणी करावी. नंतर अस्त्र निर्जंतूक 50 ग्राम + 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सामुदायिक विज्ञान

सकाळचा नाश्ता एक महत्वाचे जेवण आहे कारण रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळच्या नाशत्यामूळे शरीराला लागणाऱी उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य चांगल्या आरोग्याकरिता आवश्यक आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक75/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 16.12.2022