Thursday 28 September 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 29 सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 30 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ दिनांक 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 29 सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 30 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ दिनांक 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर व दिनांक 05 ते 11 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामूळे, उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, शेंगा पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 60 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लँम्बडा सायहँलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - 50 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90 % - 170 मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 % + लँम्बडा सायहँलोथ्रिन 4.6 %- 80 मिली (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% - 100 ते 120 मिली यापैकी कुठलेही एक कीटकनाशक प्रती एकर याप्रमाणात पावसाची उघाड बघून फवारावे. शक्य असल्यास सोयाबीन पिकातील उपटतण करून घ्यावे, जेणेकरून रब्बी हंगामात होणाऱ्या तणांचा प्रादूर्भाव कमी होईल.  काढणी केलेल्या मुग/उडीद पिकाच्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.  उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामूळे, हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 200 मिली किंवा प्रोपिकोनॅझोल 25% 200 मिली  किंवा क्लोरथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी संत्रा/मोसंबी व डाळींब बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात  मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामूळे, रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5%  किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात  मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

 

भाजीपाला

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामूळे, काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी चारा पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

तुती रेशीम उद्योग

ढगाळ हवामानात पाऊस जास्त असेल तर तुती लागवडीत तण व गवत वाढते. उघाड पडताच वखराणे पाळी करावी व तण खुरपून घ्यावे. तणनाशकाचा वापर टाळावा. हराळी जास्त असेल तर कापून घ्यावी नंतर वखर पाळी करावी. हवेत आर्द्रता 85 टक्केच्या वर असेल तर भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू) प्रादुर्भाव होतो. पानाच्या मागच्या बाजुस पांढरे डाग दिसतात. पाने कडक होऊन पिवळे पडतात. बाव्हेस्टीन (कार्बेन्डाझीम) बुरशिनाशक 500 ग्रॅम 250 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी व 5 दिवसांनी तुती पाने खाद्य म्हणून किटकांना घालतात.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक52/2023 - 2024      गुरुवार, दिनांक – 28.09.2023

 

 

 

Tuesday 26 September 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 26 सप्टेंबर रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ दिनांक 26 सप्टेंबर रोजी धाराशिव व लातूर जिल्हयात बहुतांश ठिकाणी तर दिनांक 27 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव, हिंगोली, लातूर, परभणी जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 व 29 सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 01 व 02 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 26 सप्टेंबर रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ दिनांक 26 सप्टेंबर रोजी धाराशिव व लातूर जिल्हयात बहुतांश ठिकाणी तर दिनांक 27 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव, हिंगोली, लातूर, परभणी जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 व 29 सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 01 व 02 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ते 07 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, कापूस पिकात फुलकीडे यांचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली  ‍किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस, तूर, भुईमूग पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या मुग/उडीद शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते. रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेत कुकुम्बर मोझॅक विषाणू ग्रस्त रोपे दिसून आल्यास उपटून नष्ट करावीत. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी केळी, द्राक्ष व सिताफळ बगेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी पावसाचा अंदाज बघून करावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्यूकोनॅझोल + ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

फुलशेती

गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता,  जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी.

सामुदायिक विज्ञान

बालविकासाकरिता बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक पातळीस अनुसरून मनोरंकरित्या बडबडगीते व गाणी म्हणासवयास लावा. कारण विविध गाण्यातून बालकांचा शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती विकसित होते. इतरांसमोर गाणी गायल्यामूळे आत्मविश्वास वाढुन त्यांची व्यक्तिमत्व विकासास मदत होते.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक51/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक 26.09.2023

 

 

Thursday 21 September 2023

दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली व लातूर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ दिनांक 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात बहुतांश ठिकाणी तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली व लातूर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ दिनांक 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात बहुतांश ठिकाणी तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍  दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 सप्टेंबर व दिनांक 28 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. शक्य असल्यास सोयाबीन पिकातील उपटतण करून घ्यावे, जेणेकरून रब्बी हंगामात होणाऱ्या तणांचा प्रादूर्भाव कमी होईल. सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, शेंगा पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 60 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लँम्बडा सायहँलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - 50 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90 % - 170 मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 % + लँम्बडा सायहँलोथ्रिन 4.6 %- 80 मिली (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% - 100 ते 120 मिली किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49 % + इमिडाक्लोप्रीड 19.81 % (पूर्वमिश्रित कीटकनाशक) -140 मिली किंवा असिटामाप्रीड 25 % + बाइफेन्थ्रीन 25 %-100 ग्रॅम यापैकी कुठलेही एक कीटकनाशक प्रती एकर याप्रमाणात पावसाची उघाड बघून फवारावे. काढणी केलेल्या मुग/उडीद पिकाच्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5%  किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात  मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5%  किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात  मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

गणपती व गौरी उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

तुती बागेची वाढ दणकट होण्यासाठी शेणखत व्यवस्थापन होणे महत्वाचे आहे. 20 मे. टन शेणखत/वर्ष/हे. किंवा 5 टन गांडूळ खत/हे./वर्ष द्यावे म्हणजे सर्व 16 प्रकारचे अन्न घटक तुती बागेस मिळतात. शेतकऱ्यांनी युरीया डिएपी सारख्या खतांचा अतिरेक तुती बागेत करणे घातक ठरते. त्यामूळे रसशोषण करण्याऱ्या किडीचा उदा. तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव वाढतो व पावसाच्या खंड कालावधीत शेतकरी किड नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकाची फवारणी करतात. तुती बागेवर किटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा रासायनिक खत हे शिफारसीशिवाय तुती बागेवर वारू नयेत. विषबाधेमुळे रेशीम किटक मृत पावतात. त्यामूळे जैविक किटकनाशके, लिंबोळी अर्क, लिंबोळी पेंड यांचा फवारणीसाठी वापर करावा.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 4) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 5) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

सामुदायिक विज्ञान

बालकांचा विकास साधण्यासाठी कुटुंबियांनी त्यांना सोप्या भाषेत लहान लहान गोष्टी सांगाव्यात. गोष्टी सांगत असतांना त्या आवाजात चढउतार करून, चेहऱ्यावर योग्य हाव-भाव करून व त्यासाठी चित्रांची मदत घेऊन सांगितल्यास बालकांना त्या अधिक मनोरंजक वाटतात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक50/2023 - 2024      गुरुवार, दिनांक – 21.09.2023

 

 

 

Monday 18 September 2023

मराठवाडयात दिनांक 18 ते 21 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 ते 21 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.

खरीप पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार व उपलब्धतेनूसार हलके पाणी द्यावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकाची उंची पाच फुट झाल्यास शेंडा खुडावा किंवा कापूस पिकाची वाढ थांबवण्यासाठी सायकोसिल या वाढरोधकाची 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, कापूस पिकात फुलकीडे यांचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली  ‍किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून फवारावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस, तूर, भुईमूग व उशीरा पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार हलके पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेले तूर पिक 55 ते 60 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या फुटतात. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या भुईमूग  पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. केळी व  सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करून घ्यावी.

 

 

भाजीपाला

मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

फुलशेती

गणपती व गौरी उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 4) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 5) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

सामुदायिक विज्ञान

बालविकासाकरिता बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक पातळीस अनुसरून मनोरंकरित्या बडबडगीते व गाणी म्हणासवयास लावा. कारण विविध गाण्यातून बालकांचा शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती विकसित होते. इतरांसमोर गाणी गायल्यामूळे आत्मविश्वास वाढुन त्यांची व्यक्तिमत्व विकासास मदत होते.

ईतर

पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक49/ 2023 - 2024      सोमवार, दिनांक – 18.09.2023