Thursday 29 February 2024

दिनांक 01 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात, दिनांक 02 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 01 मार्च रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 02 मार्च रोजी बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात, दिनांक 02 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 01 मार्च रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 02 मार्च रोजी बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 3 ते 4 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात पुढील चोवीस तासात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला:

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 01 ते 07 मार्च पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व दिनांक 08 ते 14 मार्च दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ते 12 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,  वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या  रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची लवकरात लवकर काढणी व मळणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास 65 ते 70 दिवसांनी पिक फुलोऱ्यात असतांना तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा लागवड केलेल्या हळद पिकात हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.  कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

चारा पीके

दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

पशुधन व्यवस्थापन

दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच  दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

वातावरणात टोकाचे बदल होऊन गैर मौसमी पाऊस पडतो आणि गारा जेव्हा पडतात तेव्हा जनावरांना त्यांच्या घरामध्ये बांधणे/गोठ्यात बांधणे. जनावरांना गोठ्यात ठेवणे, जनावरांना उबदार वातावरणामध्ये ठेवणे. उघड्या विद्युत तारांचा संपर्क टाळा. गैर मौसमी वादळ वारं पाऊस आणि गारा पडतात तापमान अचानकपणे बदलते तेव्हा जनावरांच्या तापमानाचे निरीक्षण करा. जनावरांना कार्बोदकेयुक्त आहार द्या.

सामुदायिक विज्ञान

स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट,‍ आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात. पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरील तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत. हे रंग कमी खर्चात तयार करता येतात आणि या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक ही अत्यल्प असून निव्वळ नफा भरपूर आहे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक96/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 01.03.2024

 

Monday 26 February 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 27 व 29 फेब्रुवारी तसेच 01 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 27 व 29 फेब्रुवारी तसेच 01 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 01 ते 07 मार्च दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 ते 09 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा, रब्बी ज्वारी व गहू पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, गहू पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार  सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, केळी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जालना जिल्हयात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. जालना जिल्हयात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी. जालना जिल्हयात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. जालना जिल्हयात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे,  फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

सध्या कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे उन्हाच्या तीव्रतेपासून पशुधनाच्या संरक्षणासाठी दूपारच्या वेळी जनावरे सावलीमध्ये बांधावीत.

जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे पशुधनास मोठ्या प्रमाणात इजा जखमा झाल्या असल्यास यावर तत्काल उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी हळद कडुलिंब तेल अथवा करंज तेलात ‍मिसळून जखमांवर लावावी अत्यंत कमी खर्चात हा उपचार होतो.

सामुदायिक विज्ञान

मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. या काळात बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक95/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 27.02.2024

 

 

 

Friday 23 February 2024

मराठवाडयात दिनांक 23 व 24 फेब्रूवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता अहे. दिनांक 25 ते 27 फेब्रूवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 23 व 24 फेब्रूवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता अहे. दिनांक 25 ते 27 फेब्रूवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29 फेब्रुवारी पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 01 ते 07 मार्च दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 फेब्रुवारी ते 05 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा, गहू व ज्वारी पिकाची लवकरात लवकर काढणी व मळणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे.  दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची लवकरात लवकर काढणी व मळणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास 65 ते 70 दिवसांनी पिक फुलोऱ्यात असतांना तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.  कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे) शिफारसीत खतमात्रा द्यावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. कमाल व किमान तापमानातील तफावत मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तुती बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

सामुदायिक विज्ञान

बाळाला वयाच्या 6 महिन्यानंतरही मानेवर ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक94/2023 - 2024     शुक्रवार, दिनांक – 23.02.2024

 

 

 

Monday 19 February 2024

मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 फेब्रुवारी ते 02 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या  रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार  सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी व आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता,  फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

सध्या कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे उन्हाच्या तीव्रतेपासून पशुधनाच्या संरक्षणासाठी दूपारच्या वेळी जनावरे सावलीमध्ये बांधावीत.

सामुदायिक विज्ञान

रोजच्या आहारात 30 ग्रॅम पेक्षा जास्त साखर वापरू नये कारण जास्त साखरेमूळे जास्त कॅलरी मिळतात त्यामूळे वजन वाढते. वजन वाढल्यामूळे ऱ्हदयरोग आणि मधूमेह होण्याचा धोखा असतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक93/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 20.02.2024

 

 

 

Thursday 15 February 2024

मराठवाडयात दिनांक 16 फेब्रूवारी रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची व त्यानंतर चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 16 फेब्रूवारी रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची  व त्यानंतर चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी व दिनांक 23 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास मध्यम जमिनीत 40 ते 50 दिवसांनी दूसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळकूजव्या रोगाने पिकाचे नूकसान होते. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास 65 ते 70 दिवसांनी पिक फुलोऱ्यात असतांना तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.  कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे) शिफारसीत खतमात्रा द्यावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तुती बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

सामुदायिक विज्ञान

बाळाला वयाच्या 6 महिन्यानंतरही मानेवर ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक92/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 16.02.2024