Monday 31 January 2022

मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणर नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियस ने घट होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणर नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियस ने घट होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार जमिनीतील ओलावा वाढलेला असून बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ते 12 फेब्रूवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हाळी भूईमूग पिकाची पेरणी केली नसल्यास पेरणी फेब्रुवारी ‍महिन्याच्या पहिल्या आठवडयात संपवावी. उन्हाळी भुईमूग पिकास पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे नंतर द्रव्यरूपी रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) संवर्धके प्रत्येकी 10 मिली प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी सल्फर (40 एस.सी) या फॉर्म्यूलेशनचा 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.

 

भाजीपाला

कांदा पिकावरील फुलकिडे यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 1 मिली किंवा फिप्रोनिल 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. गोचीडांचा पशुधनावर प्रचंड प्रमाणामध्ये प्रादूर्भाव वाढला असल्यामूळे एकात्मिक किड व्यवस्थापन कार्यक्रम राबवणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये गोठयातील साफसफाई करून अंडी शेकोटीमध्ये जाळणे, पाच ठक्के निम अर्कची पशुधनावर फवारणी करणे व सदरील प्रक्रिया आठवडयाच्या अंतराने तिन वेळेस करावी.

सामुदायिक विज्ञान

मैदानी खेळ हे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी असल्याने पालकांनी आपल्या बालकांना त्याकरिता प्रात्साहित करावे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक88 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 01.02.2022

 

Thursday 27 January 2022

मराठवाडयात पूढील तिन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अंश सेल्सियस ने वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील तिन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अंश सेल्सियस ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 फेब्रुवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकामध्ये फुल गळ होऊ शकते यासाठी फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकात 2% यूरीया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  गहू पिकात उत्पादन वाढीसाठी पेरणी नंतर 50 ते 55 आणि 75 दिवसांनी 19:19:19 या विद्राव्य खताची दोन किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या घ्याव्यात. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी ऊस पिकाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे संत्रा/मोसंबी बागेत खोडाभोवती अच्छादन करावे, बागेस संध्याकाळी पाणी द्यावे. बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान व कमाल तापमानातील तफावतीमूळे डाळींब बागेत फळे तडकण्याचे (क्रॅकींग) प्रमाण वाढू शकते,क्रॅकींग टाळण्यासाठी बागेत पाण्याचे योग्य नियोजन करावे. बागेत थोडेथोडे आणि संध्याकाळी चार नंतर पाणी द्यावे यामूळे बागेतील थंडी कमी राहण्यास मदत होईल.

 भाजीपाला

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास सायंकाळी पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुल पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फुलपिकास सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटए नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग  किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामुदायिक विज्ञान

घरातील फर्निचरच्या पायांना चाके असावीत, फर्निचर एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाणे सोपे जाते.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक87/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 28.01.2022

  

Monday 24 January 2022

मराठवाडयात किमान तापमानात घट होऊन दिनांक 25 जानेवारी रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 26 जानेवारी रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात किमान तापमानात घट होऊन दिनांक 25 जानेवारी रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 26 जानेवारी रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड  जिल्हयात तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 जानेवारी ते 05 फेब्रूवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे उन्हाळी भूईमूग पिकाची पेरणी लांबवावी. उन्हाळी भुईमूग पिकास पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे नंतर द्रव्यरूपी रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) संवर्धके प्रत्येकी 10 मिली प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून  बागेस सायंकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. बागेभोवती कृत्रिम वारा रोधकाची व्यवस्था करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.   किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे सकाळी थंडी वाढल्यास द्राक्ष बागेत मण्यांचे क्रॅकींग होऊ शकते. द्राक्ष बागेतील मणी तडकू नये म्हणून बागेत पाण्याचे समायोजन योग्य करावे. बागेभोवती कृत्रिम वारा रोधकाची व्यवस्था करावी. द्राक्षाचे घड जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएमच्या द्रावणात बूडवावे.

 

 

भाजीपाला

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास सायंकाळी पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे फुल पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फुलपिकास सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामुदायिक विज्ञान

घरासाठी फर्निचर निवडतांना फोल्डींग व बहूपयोगी फर्निचर निवडावे, त्यामूळे घरात अडचण न होता मोकळी जागा राहते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक86 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 25.01.2022

 

Thursday 20 January 2022

मराठवाडयात दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनीतील ओलावा कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जानेवारी ते 01 फेब्रुवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास ज्याठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला असेल आणि पिक फुलावर व दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल तेथे हलके पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन  पिकात चांगल्या उगवणीसाठी पेरणी नंतर पाच दिवसांनी पून्हा तूषार सिंचनाने हलके पाणी द्यावे.  ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा व सीट्रस सायलाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली  किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 % 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  काढणीस तयार असलेलया डाळींब फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

 

भाजीपाला

भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

तोडणीस तयार असलेल्या फुलपिकाची तोडणी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटए नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग  किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

घराला रंग देताना फिक्क्या रंगाची रंगसंगती वापरण्यावर भर द्यावा कारण पांढरा किंवा फिक्के रंग प्रकाश परावर्तित करतात व त्यामूळे खोलीचा आकार मोठा भासतो.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक85/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 21.01.2022

 

Monday 17 January 2022

मराठवाडयात दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी किमान तापमानात घट होईल त्यानंतर 20 व 21 जानेवारी रोजी किमान तापमानात वाढ होऊन परत 21 जानेवारी नंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी किमान तापमानात घट होईल त्यानंतर 20 व 21 जानेवारी रोजी किमान तापमानात वाढ होऊन परत 21 जानेवारी नंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग जास्त झालेला आहे व पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देणे गरजेचे आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास व पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे. उन्हाळी भुईमूगाच्या पेरणीसाठी प्रथम शेत ओलवून पेरणी जानेवारी महिन्याच्या दूसऱ्या पंधरवाडयात करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 किलो बियाणे वापरावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती करडई पीक फुलावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये  पिकास हलके पाणी द्यावे तसेच पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

ढगाळ वातावरण, आर्द्रता यामूळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत मणी क्रॅकिंग (द्राक्ष तडकणे) याच्या व्यवस्थापनासाठी बागेत हवा खेळती राहून मूबलक सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करावी.

 

 

भाजीपाला

मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

वजन वाढत जाणाऱ्या पाळीव प्राण्यात प्रजनन क्रिया सुलभपणे पार पडते तर वजनात घट होत राहिल्यास वंधत्व प्रमाण वाढते. तेव्हा पाळीव प्राण्यांचे दर आठवडी शरीर वजन नोंदवा आपल्या कालवडी व पारडया अनूक्रमे 250 आणि 275 किलो शरीरवजनाच्या झाल्यास पहीला माज दाखवतात.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेत सुरूवातीच्या दोन महिन्यात गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय यांच्या प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक84 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 18.01.2022

 

Thursday 13 January 2022

दिनांक 14 व 15 जानेवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात  पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पूढील चार दिवस किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 व 15 जानेवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात  तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 ते 25 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे गहू पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन 10 ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.   उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी केली नसल्यास लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी जास्तीत जास्त 15 जानेवारी पर्यंत करता येते. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  फळ तोडणीसाठी तयार असलेल्या डाळींब बागेत ढगाळ वातावरणामूळे फळांवरील बूरशीजन्य रोग नियंत्रणासाठी सल्फर 80% डब्ल्यूपी 2.5 ग्राम किंवा कॉपरयूक्त (तांबे) बूरशीनाशक 2 ते 3 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे भाजीपाला (कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी) पिकावर ‍रोगव्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

सध्या मकर संक्रांत या सणामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते व दरही चांगले मिळतात. बाजारपेठेचा अंदाज लक्षात घेऊन फुलांची तोडणी टप्याटप्याने करावी.

 

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी पासून जूनमध्ये पहिली छाटणी 1.25 फुट उंच जमीनीपासून करावी. पहिल्या वर्षात एकच झाड ठेवणे नंतर बाजूचे फुटवे 1.25 फुट उंची पर्यंत येऊ देऊ नयेत. फुटव्यांना कोवळा पाला लागतो व कोवळया तुती पाल्यात रेशीम कीटकास आवश्यक असलेले अन्नघटक प्रथीने, कार्बोहायड्रेट व शर्करेचे प्रमाण कमी असते. त्याच बरोबर कोवळया पानावर तुडतुडे, फुलकिडंयाचा प्रादुर्भाव होतो. याउलट प्रोढ कीटकांना परिपक्व तुती पानांची आवश्यकता असते म्हणून एका ठिकाणी एकच झाड ठेवावे.

सामुदायिक विज्ञान

दूधामधील कॅल्शियम हाडांसाठी तर प्रथिने हे स्नायूंच्या बळकटी करणाकरिता आवश्यक आहे. सकाळी दुध घेतल्यानंतर दिवसभर ताजे वाटते. दुधामध्ये झींक आणि विटामीन डी असल्यामूळे दुधास रोग प्रतिकार शक्ती वाढवीणारे अन्न असे समजले जाते.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक83/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 14.01.2022