Monday 29 January 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 व 02 फेब्रुवारी रोजी किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील पाच दिवसात किमान तापमानात  झालेल्या घटीमुळे उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी भुईमूग पिकात पेरणी पूर्वी पुढील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. i. थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा  5 ग्रॅम प्रति किलो बियाणे. ii. प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. प्रतयेकी 250 ग्राम किंवा द्रव स्वरूपात असेल तर प्रतयेकी 60 मिली.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत पोटॅशियम 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड 200 मिली ग्रॅम प्रति 10 लिटर द्रावणात बूडवावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक87/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 30.01.2024

Wednesday 24 January 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 26 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2024 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. सध्याचे कमाल व किमान तापमान हे मावा प्रादूर्भावास अनूकूल आहे, करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी एकेटी-101, एकेटी-103, जेएलटी-408, एकेटी-64, एनटी-11-91 या वाणांपैकी वाणाची निवड करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळाचा आकार वाढण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम  प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. तोडणीस तयार असलेल्या मृग बहार डाळींब फळांची तोडणी करावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा ईलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अं.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी. फांदी पध्दती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचं संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामूळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. सीएसआर & टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार संगोपनगृहाचा आकार असावा. खलच्या व वरील बाजूस झरोखे व मधील बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राण्यास मदत होते.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक86/2023 - 2024      गुरूवार, दिनांक 25.01.2024

Monday 22 January 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल व किमान तापमानात हळुहळु किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 26 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे.  उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी 24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पशुप्रजननाची क्रिया कालवडी, वगारीत सुरू होणे म्हणजेच जनावर माजावर येणे वयात येणे किंवा प्रजन सक्षम होणे. पशु प्रजनन संस्थेची वाढ जन्मानंतर वासराच्या वाढीशी संबंधीत असते. ज्या वासरात शरिरीक वाढीचा वेग जास्त ती वासरे लवकर वयात येतात कारण त्यांच्या प्रजनन संस्थेची वाढ ही लवकर पुर्ण होते. या उलट ज्या वासरात वाढीचा दर कमी असतो त्यांची प्रजनन संस्था लवकर तयार होत नाही व ते उशीरा माजावर येतात.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक85/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 23.01.2024

Thursday 18 January 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून किमान व कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून किमान व कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 26 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 जानेवारी 2024 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. सध्याचे कमाल व किमान तापमान हे मावा प्रादूर्भावास अनूकूल आहे, करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळाचा आकार वाढण्यासाठी 00:00:50 1 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. तोडणीस तयार असलेल्या मृग बहार डाळींब फळांची तोडणी करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजापाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा ईलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अं.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी. फांदी पध्दती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचं संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामूळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. सीएसआर & टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार संगोपनगृहाचा आकार असावा. खलच्या व वरील बाजूस झरोखे व मधील बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राण्यास मदत होते.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक84/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 19.01.2024

Monday 15 January 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 जानेवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 15 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंब्याच्या मोहरावरील भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. दिवसाचे तापमान वाढल्याने द्राक्षांची पाण्याची गरज वाढणार आहे. मण्यांच्या विकासाचा टप्पा व तापमान लक्षात घेता मल्चचा वापर करावा तसेच बागेत संध्याकाळी किंवा सकाळी पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

बालक जेव्हा अपेक्षेप्रमाणे चांगल्या कृती करतात, तेव्हा पालकांनी त्यांचे लगेच कौतूक करावे, म्हणजे पुन्हा पुन्हा चांगल्या कृती करण्यास बालकास प्रेरणा मिळते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक83/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 16.01.2024