Tuesday 31 October 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. बागायती कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून  फवारावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.  पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करता येते. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी सुर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. भारी जमिनीत पेरणी 60X30 सेंमी तर मध्यम जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या केळी बागेत तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. केळी बागेत प्रति झाड 50 ग्रॅम पोटॅश खत मात्रा द्यावी.  पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.   पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 13:00:45 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून  आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

 पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे. पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.

सामुदायिक विज्ञान

पीक कापणी आणि मळणी करतांना शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे, श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक61/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 31.10.2023

Friday 27 October 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंत पुढील तिन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 03 ते 09 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ते 07 नोव्हेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण 14 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 400 ते 500 आरपीएम तर आर्द्रतेचे प्रमाण 13 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 300 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसत असल्यास हलके पाणी द्यावे.  काढणी केलेल्या बाजरीची कणसे वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेल्या दाण्यांची उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).  खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 10 नोव्हेंबर पर्यंत करता येते. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X 10 सेंमी अंतरावर करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45X 20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व  30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे.  पाण्याची उपलब्धता असेल तरच गहू पिकाच्या लागवडीचे नियोजन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:00:50 1 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत तणनाशकाची फवारणी करू नये. पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नविन लागवड केलेल्या डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून  आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक थंड रक्ताचा किटक असून संगोपनगृहातील तापमान 20 सें.ग्रे. च्या खाली व 35 सें. ग्रे. च्या वर गेले असता तुती पाने खात नाहीत. हवामानाच्या बदलल्या ढगाळ वातावरणात संगोपनगृहात तापमापी व आर्द्रता यंत्र (ईलेक्ट्रानिक) असणे गरजेचे आहे. तापमान व आर्द्रतेचया अंदाज न आल्यामूळे खडू रोग, ग्रासरी किंवा फ्रॅचरी रोग प्रादूर्भाव रेशीम किटकास जाणवतो. दोन कोषाच्या पिकात 8 दिवसाचे अंतर ठेवावे व या काळात ब्लिचिंग पावडर 2 टक्के व कळीचा चुना 0.3 टक्के या प्रमाणे 100 लिटर पाण्यात 200 ग्रॅम ब्लिचिंग पावडर व 300 ग्रॅम चुना वापरावा नंतर 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यात अस्त्रची फवारणी 48 तासानंतर करावी.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे. पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.

सामुदायिक विज्ञान

पीक कापणी आणि मळणी करतांना शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे, श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक60/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 27.10.2023

Monday 23 October 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. बागायती कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून  फवारावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.  फुलोरा अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.  खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करता येते. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी सुर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. भारी जमिनीत पेरणी 60X30 सेंमी तर मध्यम जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या केळी बागेत तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. केळी बागेत प्रति झाड 50 ग्रॅम पोटॅश खत मात्रा द्यावी.  पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.   पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून  आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नवरात्री व दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सामुदायिक विज्ञान

पीक कापणी आणि मळणी करतांना शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे, श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक59/ 2023 - 2024      सोमवार, दिनांक 23.10.2023

Friday 20 October 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे. पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसत असल्यास हलके पाणी द्यावे.  पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या बाजरी पिकाची काढणी करून घ्यावी. पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता ऊस व हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 200 मिली किंवा प्रोपिकोनॅझोल 25% 200 मिली  किंवा क्लोरथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी.  खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 30X10 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी लहान आकाराच्या देशी वाणासाठी 60 किलो, मध्यम आकाराचे बियाणे 70 किलो तर टपोरे दाण्याच्या काबूली वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X20 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. पाण्याची उपलब्धता असेल तरच गहू पिकाच्या लागवडीचे नियोजन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता संत्रा/मोसंबी व डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी व डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:00:50 1 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून  आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नवरात्री व दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक (बॉम्बॅक्स मोरी) परिपक्व वाढ झाल्यावर या 15 व्या वाढीच्या अवस्थेत जातात. याच अवस्थतेत उझीमाशी प्रादुर्भाव करते. रेशीम किटकावर ग्रासरी, फ्लॅचरी व मस्करडीन रोगाच्या प्रादूर्भावामूळे 30 टक्के पर्यंत कोष पिकाचे नुकसान होते व उझी माशीच्या प्रादुर्भावामूळे 20 टक्के पर्यंत नुकसान होते. हे टाळण्यासाठी केलेले उपाय म्हणजेच नियंत्रण होय. कच्च्या शेडनेटचे हळू हळू पक्क्या संगोपन गृहात रूपांतर करणे. सरळ तुती फांद्या संगोपन शेडमध्ये आनून खाद्य न देणे. उझी नाश, उझी साईड व जैविक नियंत्रण करण्यासाठी उझी ट्रॅप आणि निसोलायनेक्स थायमस 2 पाऊच प्रति 100 अंडीपुज या प्रमाणे रॅकला लावणे. शेडमधिल उझी माशीचा प्रवेश थांबवणे. सर्व किटक विष्ठेसोबत उझी माशीचे कोष गोळा करून सील बंद करणे. विष्ठा खताच्या पोत्यात बांधून 25 दिवस ठेवणे तरच उझी माशीचे नियंत्रण मिळवता येईल.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सामुदायिक विज्ञान

पीक कापणी आणि मळणी करतांना शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे, श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक58/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 20.10.2023