Monday 30 January 2023

मराठवाडा विभागामध्ये पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

मराठवाडयात दिनांक 03 ते 09 फेब्रूवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफुल पिकाची काढणी करून घ्यावी. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी सर्वसाधारणपणे 100 ते 125 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत बोधांना माती लावावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या व्यवस्थापनासाठी ब्रोफ्लॅनिलीड 1.25 ग्रॅम किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल 18 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

गाय व म्हैस वर्गीय पशुधनामध्ये आतडयातील सीस्टाकझोमोसीस या आजाराचा प्रादूर्भाव सर्व वयोगटामध्ये आढळत आहे या रोगाची प्रमूख लक्षणे म्हणजे रक्त/आव मिश्रीत हगवण. या रोगावरती प्रभावी जंतनाशक उपलब्ध असून पशूवैद्यकीय तज्ञाकडून विष्ठेची तपासणी व सुश्रुशा करून घ्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे सासलेल्या तळे, ओढा, डबके इत्यादी ठिकाणी पशुधनास पाणी पिण्यासाठी न नेणे हा महत्वाचा उपाया करावा.

सामुदायिक विज्ञान

मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. या काळात बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक88/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 31.01.2023

 

 


Thursday 26 January 2023

मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात ‍दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. ‍मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात ‍दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते  मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 27 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहून तूरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर दिनांक 03 ते 09 फेब्रूवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ते 07 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या हळद पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता उशीरा लागवड केलेल्या काढणी/मळणी केलेल्या तूर पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी एकेटी-101, एकेटी-103, जेएलटी-408, एकेटी-64, एनटी-11-91 या वाणांपैकी वाणाची निवड करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळ सध्या वटाण्याच्या आकाराचे आहेत, फळगळ होऊ नये म्हणून बागेत जिब्रॅलिक ॲसिड 10 पीपीएम (1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी) फवारणी करावी.  मृग बहार डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फुलशेती

फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटणी नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग  किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. तेव्हा या काळात बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक87/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 27.01.2023

 


Monday 23 January 2023

दिनांक 25 जानेवारी रोजी बीड व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 25 जानेवारी रोजी बीड व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 27 जानेवारी ते 02 फेब्रूवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहून तूरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलावा कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या तूर पिकाची व काढणी केलेल्या रब्बी भुईमूग,  हळद व रब्बी सूर्यफुल पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी 24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाऊस झाल्यास केळी बागेत करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. आंबा बागेत फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी हेक्झाकोनॅझोल 5 ईसी 1 मिली किंवा डायफेनकोनॅझोल 25 ईसी 0.5 ग्रॅम किंवा टेट्राकोनॅझोल 3.8 ईडब्ल्यू 0.75 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

गाय व म्हैस वर्गीय पशुधनामध्ये आतडयातील सीस्टाकझोमोसीस या आजाराचा प्रादूर्भाव सर्व वयोगटामध्ये आढळत आहे या रोगाची प्रमूख लक्षणे म्हणजे रक्त/आव मिश्रीत हगवण. या रोगावरती प्रभावी जंतनाशक उपलब्ध असून पशूवैद्यकीय तज्ञाकडून विष्ठेची तपासणी व सुश्रुशा करून घ्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे सासलेल्या तळे, ओढा, डबके इत्यादी ठिकाणी पशुधनास पाणी पिण्यासाठी न नेणे हा महत्वाचा उपाया करावा.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या दोन महिन्यात गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय यांच्या प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक86/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 24.01.2023

 

 

 

Thursday 19 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. ‍

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. ‍

मराठवाडयात दिनांक 20 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहून तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर दिनांक 27 जानेवारी ते 02 फेब्रूवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहून तूरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे हरभरा, करड पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे मृग बहार संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृग बहार डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी.

भाजीपाला

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

 

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटणी नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग  किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

बालसंगोपन हे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. त्यामूळे नवविवाहीत दाम्पत्यांनी पूर्व तयारीनिशी पालकत्वाची जबाबदार स्कारावी. अशी तयारी करत असतांना ते शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे. तसेच त्यांना बाल संगोपनाविषयी शास्त्रोक्त माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक85/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 20.01.2023

 

Monday 16 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 20 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफुल पिकाची काढणी करून घ्यावी. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 8 फेब्रुवारी पर्यंत करता येते.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत मागील आठवडयात किमान तापमानात झालेल्या घटीमूळे वाढ खुंटली असल्यास 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. आंबा बागेत फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट 2022 पासून चालू आहे व त्याची तिव्रता लसीकरणामूळे कमी झाली असली तरीही आजही  नवीन नवीन पशु व वासरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी (1) राहीलेल्या पशुधनास तात्काळ लसीकरण करणे. (2) महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या “माझा गोठा-स्वच्छ गोठा” याची माझ्या गोठ्यामध्ये अमलबजावणी व दैनंदिन स्वच्छता आमलात आणणे. (3) गोचीडाचा प्रादुर्भाव रोखणे. गोचीड या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. (4) लागण झालेल्या पशुचे विलगीकरण-आजारी पशुस ईतर पशुपासून दुर विलगीकरणामध्ये ठेवणे. (5) रोगी पशु असलेला गोठा सोडीयम हायपोक्लोराईट ने निर्जंतुकीकरण करणे हे उपाय सलग चालू ठेवावेत.

सामूदायीक विज्ञान

प्रत्येक बालक हे त्यांच्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची अनमोल संपत्ती आहे. त्यामूळे त्यांची काटेकोरपणे काळजी घेणेही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

सौजन्य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक84/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 17.01.2023

 

Thursday 12 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होईल. दिनांक 16 व 17 जानेवारी दरम्यान बीड व लातूर जिल्हयात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होईल. दिनांक 16 व 17 जानेवारी दरम्यान बीड व लातूर जिल्हयात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 13 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 20 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. 

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रब्बी पिकास, फळबागेस, भाजीपाला पिकास, फुलपि कास, रोपवाटीकेस रात्री हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम हरभरा पिकास होऊ नये म्हणून पिकास रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 200 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम करडई पिकास होऊ नये म्हणून पिकास रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  गहू पिकास हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून घ्यावेत (घडांना सर्क्टींग करावी). केळी बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. केळी बागेत करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे, जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.  द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे.

भाजीपाला

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे भाजीपाला पिकास रात्री सिंचन करावे. भाजीपाला पिकात 2 टक्के 13:00:45 ची फवारणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेंडाझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. मकर संक्रांतीमूळे बाजारपेठेत काही भाज्यांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या भाज्यांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

फुलशेती

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुल पिकास रात्री सिंचन करावे. मकर संक्रांतीमूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

 

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे (तापमान 6 ते 8 अं.से. पर्यंत खाली आल्यामूळे) मुख्यता करडे, कोंबडीची पिल्ले व एकुणच लहान जनावरांच्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो. गारठणे (चिलींग) किंवा कधी कधी बर्फाचे चावणे (फ्रॉस्ट बाईट) ई. समस्या उदभवतात. गारठण्यामूळे पुढे घातक न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह) तर बर्फाच्या चावण्यामुळे पुढे गँग्रीन सारख्या समस्या उदभवू शकतात (मुख्यता बर्फाळ प्रदेशामध्ये). मुख्यता कोंबड्यांमध्ये थंडीमूळे कोरायझा हा आजार उदभवतो, तर करडांमध्ये देखील मरतुक वाढण्याची भिती वाढते. आपल्या जनावरांना अधिक उब कशी मिळेल ते पहा जसेकी पोत्यांचे पडदे लावून गोठ्यामध्ये उब निर्माण करणे मोठा बल्ब लावणे, गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, दिवसा पडदे  काढून उन्हामूळे मिळणारी उष्णता निर्माण करणे, पाण्यामधून रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी जसे की ई-केअर सी, ईम्यूनोलाईट पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देण, शक्यतो उष्ण पाणी (बोरचे ताजे पाणी) देणे.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक83/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 13.01.2023