Tuesday 29 March 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 104 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 29.03.2022


 

मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 एप्रिल ते 09 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून मजूरांना उष्णतेचा त्रास होणार नाही. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता गहू पिकाची काढणी व मळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून मजूरांना उष्णतेचा त्रास होणार नाही. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी  भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी  सोयाबीन पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता बागेचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती कृत्रिम वारा रोधकाची (हिरवी नेट) व्यवस्था करावी.काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता झाडाच्या खोडाभोवती पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे. जेणेकरून मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल व फुल गळ/फळ गळ होणार नाही. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत झाडावर पाण्याचा फवारा घ्यावा. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

फळबाग

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता झाडाच्या खोडाभोवती पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे. जेणेकरून मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. नविन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी व कलमांभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

टरबूज/ खरबूज

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता टरबूज/खरबूज पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. पिकाचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती कृत्रिम वारा रोधकाची (हिरवी नेट) व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. शेताभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. भाजीपाला पिकात पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे.

फुलशेती

तूरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा  ठिबक) वापर करावा. शेताभोवती हिरव्या नेटचा वापर करावा. फुल पिकात पिकाचे अवशेष/पेंढा/पॉलिथीन/गवताचे आच्छादन करावे.

कुक्कुट पालन

कोंबडयांच्या शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेंन्टीलेटर्स (रुंद खिडक्यांची व्यवस्था करावी तसेच त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शेडच्या छतावर गवताचे किंवा पोत्यांचे आच्छादन करावे व अधून मधून त्यावर पाणी शिंपडावे म्हणजे शेडच्या आतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. पक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था करावी. पक्ष्यांना सकाळी किंवा संध्याकाळी खाद्य द्यावे. शेडमध्ये पक्ष्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी  शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सामुदायिक विज्ञान

शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करतांना भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. उन्हात (विशेषत: दूपारी 12 ते 3) बाहेर जाणे टाळावे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक104 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 29.03.2022

 

Friday 25 March 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 103/2021 - 2022 शुक्रवार, दिनांक – 25.03.2022


 

आज दिनांक 25 मार्च रोजी उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.‍ मराठवाडयात पुढील 2 ते 3 दिवस आकाश ढगाळ राहील. आज दिनांक 25 मार्च रोजी उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 मार्च ते 05 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

आज दिनांक 25 मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या हरभऱ्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करूण साठवणूक करावी. आज दिनांक 25 मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या गव्हाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावि. उन्हाळी सोयाबीन पिकात शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 या द्रवरूप रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस तोडणीनंतर 45 दिवसांनी नत्राचा दूसरा हप्ता हेक्टरी 75 किलो युरियाद्वारे देउन पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  आज दिनांक 25 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, फळगळ दिसून येत असल्यास 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी.  काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

 

भाजीपाला

भाजीपाला पिकास जमिनीच्‍या प्रकारानुसार दोन पाण्‍याच्‍या पाळयातील अंतर कमी करावे. भाजीपाला पिकास पाणी शक्यतो सुक्ष्म सिंचन पध्दतीने सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.

फुलशेती

फुल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. मोगरा फुलांची तोडणी सकाळी लवकर करावी.

चारा पिके

उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सुक्ष्‍म सिंचन पध्‍दतीने पाणी व्‍यवस्‍थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासून 4 ते 5 वेळा दिड महिन्याच्या अंतराने तुती फांद्या कापणी करून रेशीम कीटकांना खाद्या आपण देत असतो. यामध्ये तुतीच्या वाढीचा 3 ते 4 फुटापर्यंतचा मोठा जैविक घटक तुती खाद्य म्हणून वारंवार वापरला जात असल्यामुळे जमीनीत सेंद्रीय खत देणे आवश्यक आहे. म्हणजे 20 मोडन प्रति हेक्टर प्रति वर्ष किंवा 5 मे.टन गांडूळ खत 2 मे. टन/एकर वर्षातून दोन वेळा जुन व नोव्हेंबर महिण्यात समान दोन हप्त्यात द्यावे. तेव्हा दर्जेदार तुती पानाचे उत्पादन मिळते. अन्यथा तिसऱ्या वर्षापासून पुढे जास्त फटवे फुटुन तुती पानाची प्रत खालावते व रेशीम कीटक कुपोषीत राहतात. रोगास बळी पडतात व कोषाचे पीक वाया जाते.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक103/2021 - 2022     शुक्रवार, दिनांक – 25.03.2022

 

Tuesday 22 March 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 102 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 22.03.2022


 

मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 3 ते 4 दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 3 ते 4 दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 मार्च ते 02 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त तर किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.  कापणीस तयार असलेलया करडईची कापणी करावी. कापणी सकाळी करावी म्‍हणजे हातांना काटे टोचत नाहीत आणि बोंडातील दाणेही गळत नाहीत; तसेच हातांना काटे टोचु नये म्‍हणून कपडा किंवा हातमोजे वापरावेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या गुलाब, मोगरा, जिलारडिया फुलांची काढणी करून घ्यावी. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता फुलपिकात पाणी व्यवस्थापन करावे.

 

 

पशुधन व्यवस्थापन

पिसवांचा पशुधनास होणारा प्रादुर्भाव ही एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून त्यांच्या नियंत्रणासाठी त्रिसुत्रीचा वापर आवश्यक आहे. एक म्हणजे पशुधनास काही कालावधीसाठी नियमीत गोठ्यापासून दुर अंतरावर ठेवणे. नियमीत गोठा आठवडयाच्या अंतराने छतापासून जमीनीपर्यंत साफ करून 4% मीठाच्या द्रावणाने फवारणेव तिसरे म्हणजे पिसवांची लागण झालेल्या पशुधनास वनस्पतीजन्य/रासायनीक किटकनाशकाची फवारणी पशुवैद्यक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे. उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक102 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 22.03.2022

 

Thursday 17 March 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 101/2021 - 2022 गुरूवार, दिनांक – 17.03.2022


 

मराठवाडयात पुढील दोन दिवस तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.‍ तसेच दिनांक 19 मार्च नंतर आर्द्रतेत वाढ होऊन आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.‍ तसेच दिनांक 19 मार्च नंतर आर्द्रतेत वाढ होऊन आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची, किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून मळणी करून घ्यावी. हरभ-याच्‍या परिपक्‍वतेच्‍या काळात पाने पिवळी पडतात, घाटे वाळु लागतात. त्‍यानंतर पिकाची कापणी करावी. अन्‍यथा पीक जास्‍त वाळल्‍यास घाटेगळ होऊन पिकाचे नुकसान होते. उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर पेरणी केलेलया गहू पिकाची कापणी व मळणी करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावि. उन्हाळी सोयाबीन पिकात शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 या द्रवरूप रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, फळगळ दिसून येत असल्यास 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी.  काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हात फवारणी करू नये.  

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

तुती लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासून 4 ते 5 वेळा दिड महिन्याच्या अंतराने तुती फांद्या कापणी करून रेशीम कीटकांना खाद्या आपण देत असतो. यामध्ये तुतीच्या वाढीचा 3 ते 4 फुटापर्यंतचा मोठा जैविक घटक तुती खाद्य म्हणून वारंवार वापरला जात असल्यामुळे जमीनीत सेंद्रीय खत देणे आवश्यक आहे. म्हणजे 20 मोडन प्रति हेक्टर प्रति वर्ष किंवा 5 मे.टन गांडूळ खत 2 मे. टन/एकर वर्षातून दोन वेळा जुन व नोव्हेंबर महिण्यात समान दोन हप्त्यात द्यावे. तेव्हा दर्जेदार तुती पानाचे उत्पादन मिळते. अन्यथा तिसऱ्या वर्षापासून पुढे जास्त फटवे फुटुन तुती पानाची प्रत खालावते व रेशीम कीटक कुपोषीत राहतात. रोगास बळी पडतात व कोषाचे पीक वाया जाते.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक101/2021 - 2022      गुरूवार, दिनांक – 17.03.2022

 

Tuesday 15 March 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 100 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 15.03.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर मराठवाडयात तापमानात 2 ते 3 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर मराठवाडयात तापमानात 2 ते 3 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 मार्च ते 26 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.  कापणीस तयार असलेलया करडईची कापणी करावी. कापणी सकाळी करावी म्‍हणजे हातांना काटे टोचत नाहीत आणि बोंडातील दाणेही गळत नाहीत; तसेच हातांना काटे टोचु नये म्‍हणून कपडा किंवा हातमोजे वापरावेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

उन्हाळी भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून वर खताची मात्रा देऊन पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या गुलाब, शेवंती, जिलारडिया फुलांची काढणी करून घ्यावी. फुलपिकात तणनियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

 

 

पशुधन व्यवस्थापन

उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते. गाय व म्हैस या पशुधनामध्ये उन्हाळा ऋतूमध्ये माजावर येण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी केवळ चाऱ्याची कमतरता हेच एकमेव कारण नसून गोठा व्यवस्थापन देखील तेवढेच महत्वाचे आहे. गोठयाचे व्यवस्थापन असे करावे की, गोठयातील तापमानामध्ये घट होऊन तापमान आर्द्रता निर्देशांक वाढणार नाही व पर्यायी ऊर्जा संवंर्धीत होऊन गाय व म्हैस माजावर येण्याचे प्रमाण सातत्याने टिकून राहील.

सामुदायिक विज्ञान

स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट,‍ आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात. पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरल तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक100 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 15.03.2022

 

Thursday 10 March 2022

दिनांक 11 मार्च रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 मार्च नंतर मराठवाडयात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 मार्च रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)  राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 मार्च नंतर मराठवाडयात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 11 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या हरभरा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. हरभ-याच्‍या परिपक्‍वतेच्‍या काळात पाने पिवळी पडतात, घाटे वाळु लागतात. त्‍यानंतर पिकाची कापणी करावी. अन्‍यथा पीक जास्‍त वाळल्‍यास घाटेगळ होऊन पिकाचे नुकसान होते. दिनांक 11 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या गहू पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गव्हाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून दिनांक 11 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, फळगळ दिसून येत असल्यास 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी.  डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वेलवर्गीय भाजीपाला पिकात नाग अळी/पाने पोखरणारी अळी चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी    सायाट्रानिलिप्रोल 10.26% 18 मिली  प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात तणनियंत्रण करून पाणी  व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके

चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

सेंदीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हैसूर यांच्या शिफारशीनुसार रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करणे गरजेचे आहे.उझीसाइड, स्टिकीटाय, निसोलायनेक्सचा जैविक उपाय व उझीट्राय या सर्व पर्यायांचा एकत्रित वापर केला तर 84% पर्यंत उझी माशीचे नियंत्रण होते. सर्व खिडक्या दरवाज्यांना नायलॉन वायरमेश जाळी लावणे आवश्क असून दरवाजे अपोआप बंद होण्याची व्यवस्था करणे  रॅकला चोहीबाजुने नायलॉन वायर मेशने अच्छादिन करणे त्याच बरोबर संगोपन गृह प्रवेश द्वारा बाहेर नायलॉन वायर मेशचा वापर करून 10 x 10 आकाराचे  अँटीचेम्बर तयार करणे म्हणजे शेतातून तुतीपाला आणल्यानंतर सरळ संगोपन गृहात न आणता 1 ते 2 तास  अँटीचेम्बर मध्ये ठेवावे.  अँटीचेम्बर अंधार खोली सारखे करावे म्हणजे उझी माशी बाहेरच्या बाजूस उडून निघून जाईल.   

सामुदायिक विज्ञान

स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट,‍ आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात. पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरल तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक99/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 11.03.2022