Friday 28 April 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 08/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 28.04.2023


 

दिनांक 28 एप्रिल रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तर दिनांक 29 एप्रिल रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 30 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 01 मे रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर व बीड जिल्हयात तर दिनांक 02 मे रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 28 एप्रिल ते 04 मे 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 05 ते 11 मे 2023 दरम्यान सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार औरंगाबाद जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहेत तर इतर जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 ते 09 मे 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून "मेघदूत" अँड्रॉइड अॅप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट इ.च्या अंदाजासाठी "दामिनी" अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, पाऊस व गारपीट झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वारा, पाऊस व गारपीट झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. केळी बागेस आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. एप्रिल छाटणी झालेल्या द्राक्ष बागांमध्ये 1% बोर्डो मिश्रणाच्या एक किंवा दोन फवारण्या कराव्यात. जेणेकरून रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यास मदत होईल. द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. वादळी वारा, पाऊस व गारपीट झालेल्या फळबागेत सर्व नुकसानग्रस्त फळे काढून, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्डयामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर 10 % बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या बहाराची तयारी करावी. गारपीट व पावसामूळे ईजा झालेल्या फळांची काढणी करावी आणि फळे कुजलेली दिसत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री करावी. चिरलेली व नुकसानग्रस्त फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्डयात टाकावीत. फळांच्या काढणीपूर्वी बोरीक ॲसिड 2 ग्रॅम प्रति लिटरची संरक्षणात्मक फवारणी घ्यावी जेणेकरून ईजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. वादळी वारा, पाऊस व गारपीट झालेल्या अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. छाटणी नंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस ताण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. लातूर जिल्हयात काल झालेल्या पावसामूळे लातूर जिल्हयात फळबागेस पाणी देणे पुढे ढकलावे.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, कांदा, टोमॅटो, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, पाऊस व गारपीट झालेल्या ठिकाणी प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. लातूर जिल्हयात काल झालेल्या पावसामूळे लातूर जिल्हयात फळबागेस पाणी देणे पुढे ढकलावे.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा. फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. लातूर जिल्हयात काल झालेल्या पावसामूळे लातूर जिल्हयात फळबागेस पाणी देणे पुढे ढकलावे.

पशुधन व्यवस्थापन

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक08/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक 28.04.2023

 

Tuesday 25 April 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 07/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 25.04.2023


 

दिनांक 25 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 26 एप्रिल रोजी हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व परभणी जिल्हयात तर दिनांक 27 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 25 एप्रिल रोजी धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 26 एप्रिल रोजी धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 27 एप्रिल रोजी धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 28 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 29 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 26 एप्रिल रोजी हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व परभणी जिल्हयात तर दिनांक 27 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात  तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 28 एप्रिल ते 04 मे 2023 दरम्यान पाऊस किंचित सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 एप्रिल ते 06 मे 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी व काढणी केलेले फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्टी करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्टी करावीत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास सर्व नुकसानग्रस्त फळे काढून, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्डयामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर 10 % बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या बहाराची तयारी करावी. गारपीट व पावसामूळे ईजा झालेल्या फळांची काढणी करावी आणि फळे कुजलेली दिसत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री करावी. चिरलेली व नुकसानग्रस्त फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्डयात टाकावीत. फळांच्या काढणीपूर्वी बोरीक ॲसिड 2 ग्रॅम प्रति लिटरची संरक्षणात्मक फवारणी घ्यावी जेणेकरून ईजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल.  वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. छाटणी नंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस ताण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, कांदा, टोमॅटो, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा.

पशुधन व्यवस्थापन

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक07/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 25.04.2023

 

 

Friday 21 April 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 06/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 21.04.2023


 

दिनांक 21 एप्रिल रोजी हिंगोली, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 25 एप्रिल रोजी जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 21 एप्रिल रोजी हिंगोली, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 25 एप्रिल रोजी जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 28 एप्रिल ते 04 मे 2023 दरम्यान पाऊस किंचित सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 एप्रिल ते 02 मे 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून "मेघदूत" अँड्रॉइड अॅप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट इ.च्या अंदाजासाठी "दामिनी" अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वादळी वारा व पाऊस यामूळे पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. छाटणी नंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस, डाळींब व चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस ताण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. डाळींब बागेतील सर्व नुकसानग्रस्त फळे काढून, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्डयामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर 10 % बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या बहाराची तयारी करावी. गारपीट व पावसामूळे ईजा झालेल्या फळांची काढणी करावी आणि फळे कुजलेली दिसत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री करावी. चिरलेली व नुकसानग्रस्त फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्डयात टाकावीत. फळांच्या काढणीपूर्वी बोरीक ॲसिड 2 ग्रॅम प्रति लिटरची संरक्षणात्मक फवारणी घ्यावी जेणेकरून ईजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

 

 

 

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

अक्षय तृतीयामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुलपिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मुबलक प्रमाणा हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणवठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरावयास सोडावे.

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनी काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक संगोपन दुसऱ्या वर्षापासून करणे सोयीचे ठरते. पहिल्या वर्षात तुती झाडे एक काडीवर असल्याने कमी तुती पाने खाद्य मिळते. दुसऱ्या वर्षापासून वर्षाला 5 ते 6 कोषाची पीके घेण्यासाठी आवश्यक 18 ते 20 टन प्रति एकर पानाचे उत्पादन सुरू होते. शंभर अंडी पुंजासाठी 1000 चौ.फुट चटई क्षेत्र या प्रमाणे रॅकवर जागा लागते. दुसऱ्या वर्षापासून एकरी 250 ते 300 अंडीपुंज एक वेळा घेता येतात व त्यासाठी 3 टन तुती पाने व दुप्पट फांद्या तुती खाद्य लागते. उच्च प्रतीच्या तुती पाने उत्पादनाचा यशस्वी कोष उत्पादनात 38 टक्के वाटा आहे. त्यामूळे प्रति वर्ष शिफारसीत खत 20 मे.टन/हेक्ट र व गांडूळ खत 5 टन/हेक्टर देणे आवश्यक आहे.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक06/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक 21.04.2023

 


Tuesday 18 April 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 05/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 18.04.2023


 

दिनांक 18 एप्रिल रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव, लातूर, नांदेड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन, त्यानंतर पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव, लातूर, नांदेड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 एप्रिल 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. भुईमूग पिकात आऱ्या सुटल्या नंतर अंतर मशागत करू नये. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. बहुतांश आंबा बाग काढणी पूर्व अवस्थेत असुन बागेस पाणी देण्यात येऊ नये. वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी. सर्व नुकसानग्रस्त फळे काढून, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्डयामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर 10 % बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या बहाराची तयारी करावी. गारपीट व पावसामूळे ईजा झालेल्या फळांची काढणी करावी आणि फळे कुजलेली दिसत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री करावी. चिरलेली व नुकसानग्रस्त फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्डयात टाकावीत. फळांच्या काढणीपूर्वी बोरीक ॲसिड 2 ग्रॅम प्रति लिटरची संरक्षणात्मक फवारणी घ्यावी जेणेकरून ईजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

पशुधन व्यवस्थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने  भिजवून ठेवावे.

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

कृषि अभियांत्रिकी

रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक05/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक 18.04.2023

 

 

Thursday 13 April 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 04/2023 - 2024 गुरूवार, दिनांक – 13.04.2023


 

दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 13 14 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 16 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 14 ते 20 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून "मेघदूत" अँड्रॉइड अॅप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट इ.च्या अंदाजासाठी "दामिनी" अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या मालाची (गहू, करडई, रब्बी ज्वारी व मका) सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी पुढे ढकलावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या चिकू, संत्रा/मोसंबी व द्राक्ष फळांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक (गोदामात) करावी. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा.

पशुधन व्यवस्थापन

तुरळकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे चेतावनीच काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

तुती रेशीम उद्योग

केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार रेशीम कीटक संगोपन आराखडा अद्यावत असणे आवश्यक आहे. मनरेगा किंवा नानासाहेब देशमुख कृषि संजिवनी (पोक्रा) योजना घेतलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे संगोपन गृह आराखडा 50X20 फुट लांबी रूंदीचा म्हणजे 1000 चौ.फुट क्षेत्रफळ असलेला बनवला आहे. एक एकर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्याला दुसऱ्या वर्षापासून वर्षाला 5 ते 6 कोषाची पीके काढता येतात म्हणजे एक वेळा 250 ते 300 अंडिपुज तो शेतकरी घेऊ शकतो. पण त्याला अडचण अशी येते की, योजनेत घेतलेले शेडनेट संगोपन गृह 1000 चौ.फुटच क्षेत्र लागते त्यातच 250 ते 300 अंडिपुज तो शेतकरी घेतो आणि रेशीम किटकास दाटी झाल्यामूळे ग्रासरी, फ्लॅचरी रोग प्रादूर्भाव होतो. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासुन पुढे आपल्या शेडनेट संगोपन गृहाचा आराखडा दुप्पट म्हणजे 100X23X15 फुट लांबी, रुंदी व उंची याप्रमाणे करावा व तुती लागवड क्षेत्र 1.5 एकर कमीत कमी असावे, म्हणजे एक वेळेस 400 ते 500 अंडिपुजाचे 5 ते 6 कोषाची पीके घेता येतील.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक04/2023 - 2024      गुरूवार, दिनांक – 13.04.2023