Thursday 28 December 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहून, किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहून, किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 29 डिसेंबर ते 04 जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 05 ते 11 जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 ते 09 जानेवारी 2024 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवडे झाले असल्यास 260 किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये. हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 15 ग्रॅम 00:00:50 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अंबे बहार धरण्यासाठी मोसंबी बागेस 500:500:500 ग्रॅम व संत्रा बागेस 400:400:400 ग्रॅम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी व बागेस पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.  डाळींब बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी प्रति झाड 300:250:250 ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश खतमात्रा देऊन बागेस पाणी द्यावे. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 100 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 200 ग्रॅम प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा ईलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अं.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी. फांदी पध्दती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचं संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामूळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. सीएसआर & टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार संगोपनगृहाचा आकार असावा. खलच्या व वरील बाजूस झरोखे व मधील बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राण्यास मदत होते.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक78/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 29.12.2023

Monday 25 December 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 29 डिसेंबर ते 04 जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 31 डिसेंबर ते 06 जानेवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. उशीरा पेरणी केलेल्या तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर  किंवा थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास पोटरी येण्याच्या आवस्थेत संध्याकाळी पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मका पिकास आवश्यकतेनूसार संध्याकाळी पाणी द्यावे. रब्बी सूर्यफूल फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना संध्याकाळी पाणी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी). केळी बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.  आंब्याच्या मोहोरावर तूडतूड्यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.  आंब्याच्या मोहोरावर भूरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास गंधक 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.

भाजीपाला

भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार संध्याकाळी पाणी द्यावे.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक77/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 26.12.2023

Thursday 21 December 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहून, पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होऊन त्यानंतर पुढील तिन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व दिनांक 29 डिसेंबर ते 04 जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा, करडई व हळद पिकास हलके पाणी द्यावे. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी करावी किंवा आळवणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल 70 डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास फुटवे फुटण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे.  11 ते 12 महिन्याचा ऊस लोळला असल्यास लवकरात लवकर तोडणी करून कारखान्यात पाठवावा. हळद पिकातील पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4 एस सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  स्टिकरसह फवारणी करावी. हळद पिकातील कंद सड याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील 4% + मॅनकोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी 00:00:50 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी व केळी बागेत रात्री सिंचन करावे. संत्रा/मोसंबी, द्राक्ष व केळी बागेत खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी). किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास हलके पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकास हलके पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा ईलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अं.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी. फांदी पध्दती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचं संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामूळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. सीएसआर & टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार संगोपनगृहाचा आकार असावा. खलच्या व वरील बाजूस झरोखे व मधील बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राण्यास मदत होते.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक76/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 22.12.2023

Monday 18 December 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही दिनांक 22 व 23 डिसेंबर, 2023 रोजी किमान तापनामात घट होण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही दिनांक 2223 डिसेंबर, 2023 रोजी किमान तापनामात घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा  किंचित कमी झालेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावरील 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. उशिरा पेरणी केलेल्या तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या  फायटोफथोरा मर व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम + मेटॅलॅक्झील + मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर  किंवा थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकात तण नियंत्रणासाठी पिकात कोळपणी करून घ्यावीमका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.रब्बी सूर्यफूल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस पहाटे मोकाट पद्द्धतीने पाणी द्यावे.आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत घडांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्ष घड पहिल्यांदा 10 पिपिएम जिब्रॅलिक ॲसिडच्या द्रावणात बूडवावेत.

भाजीपाला

भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. पशुधनातील प्रजननाच्या समस्यांचे वेळेत निदान आणि योग्य उपचार न केल्यास अधिक तोटा उदभवतो. राज्य शासनाच्या “राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानातंर्गत” आपल्या कडील सर्व जनावरांची गाभण करण्याबाबतची तपासणी व उपचार करून घ्यावेत.

सामुदायिक विज्ञान

सकाळचा नाश्ता एक महत्वाचे जेवण आहे कारण रात्रभर उपाशी राहील्या नंतर सकाळच्या नाश्त्यामूळे शरीराला लागणाऱ्या उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य चांगल्या आरोग्याकरीता आवश्यक आहे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक75/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 19.12.2023

Thursday 14 December 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील. दिनांक 15 ते 17 डिसेंबर दरम्यान आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 15 ते 21 डिसेंबर व 22 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 ते 26 डिसेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकातील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात प्रति एकरी 02 कामगंध सापळे व 10 पक्षी थांबे उभारावेत. रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम किंवा फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी करावी किंवा आळवणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल 70 डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात.  उशीरा बागायती गहू पेरणी लवकरात लवकर संपवावी. उशीरा पेरणीसाठी व कमी पाण्यावर येणाऱ्या फुलेनेत्रावती व फुलेसात्वीक या वाणांची निवड करावी. 11 ते 12 महिन्याचा ऊस लोळला असल्यास लवकरात लवकर तोडणी करून कारखान्यात पाठवावा. हळद पिकातील पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4 एस सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  स्टिकरसह फवारणी करावी. हळद पिकातील कंद सड याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील 4% + मॅनकोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी 00:00:50 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या डाळींब व चिकू फळाचीं काढणी करून घ्यावी. डाळींब व चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात (टोमॅटो, मिरची, वांगी) करपा या रोगांचा प्रादूर्भाव होऊ शकतो या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब 75% किंवा क्लोरोथॅलोनील 75% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा ईलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अं.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी. फांदी पध्दती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचं संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामूळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. सीएसआर & टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार संगोपनगृहाचा आकार असावा. खलच्या व वरील बाजूस झरोखे व मधील बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राण्यास मदत होते.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. पशुधनातील प्रजननाच्या समस्यांचे वेळेत निदान आणि योग्य उपचार न केल्यास अधिक तोटा उदभवतो. राज्य शासनाच्या “राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानातंर्गत” आपल्या कडील सर्व जनावरांची गाभण करण्याबाबतची तपासणी व उपचार करून घ्यावेत.

सामुदायिक विज्ञान

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी स्वत:चे मनोबल वाढवावे. या संकटाचा सामना करण्यासाठी उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्याकरिता कृषि तज्ञांचा सल्ला घ्यावा. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर निश्चितपणे मात करता येईल याबाबत आशवादी असावे. गावातील प्रगतीशील शेतकरी सध्याच्या बिकट परिस्थितीवर ज्याप्रकारे मात करत आहेत त्याप्रमाणे आपणही प्रयत्नशील असावे. आपल्या अडचणीबाबत आपले जीवलग मित्र/कुटुंबिय यांच्यासोबत चर्चा करून त्या योग्य मार्गाने दूर करण्याचा प्रयत्न करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक74/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 15.12.2023