Thursday 30 December 2021

मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 जानेवारी 2022 ते 11 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी पडत असलेल्या हलक्या पावसामूळे व औरंगाबाद व जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे भिजलेला कापूस वाळल्यानंतरच त्याची वेचणी करावी व या कापसाची साठवणूक वेगळी करावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. तूरळक ठिकाणी पडत असलेल्या हलक्या पावसामूळे व औरंगाबाद व जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे भिजलेल्या तूर पिकाची  वाळल्यानंतरच कापणी व मळणी करावी. मळणी केलेले बियाणे उन्हात वाळवून साठवणूक करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे गहू पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन 10 ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ व दमट वातावरणामूळे करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे उशीरा लागवड केलेल्या हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे द्राक्ष बागेत डाऊनी मिल्डयूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲमिसूलब्रुम 17.5 % एससी 0.375 मिली किंवा फ्युयोपिकोलाईड 4.44% + फोसेटिल एएल 66.67% संयूक्त बूरशीनाशक 2.5 ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ते 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  वादळी वारा, पाउस औरंगाबाद व जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर 1 % बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे फळबागेत (डाळिंब, संत्रा/मोसंबी, आंबा) रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बागेत मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे भाजीपाला (कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी) पिकावर ‍रोगव्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावे, तसेच त्यांना थंडीपासून संरक्षणासाठी कोरडी/उबदार जागेची व्यवस्था करावी. हिवाळयात जनावरांना उर्जेची गरज भागविण्यासाठी नियमितपणे जनावरांना खारटमिश्रणासह मिठ व गव्हाचे धान्य, गूळ इत्यादी 10 ते 20 टक्के प्रति दिवस द्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कोषाच्या प्रत्येक पीकामध्ये 20 टक्के पर्यंत कोष उत्पादनात कीटकावरील येणाऱ्या रोगांमूळे घट येऊ शकते. रोगकारक जीवाणू, विषाणू किंवा बुरशीचा संगोपनगृहातून पूर्णपणे नायनाट होणे आणि संगोपन साहित्याचे नियमित निर्जंतूकीकरण होणे गरजेचे असते. त्यामूळे भींती किंवा शेडनेटवर 200 मिली प्रती चौरस मीटर या प्रमाणात ब्लिचींग पावडर 02 टक्के आणि 0.3 टक्के विरी गेलेला चूणा द्रावणासोबत फवारणी करावी व नंतर 24 तासांनी अस्त्र निर्जंतूक पावडर 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारलेले उर्वरीत पाणी रोगकारकासोबत नालीतून संगोपनगृहाबाहेर वाहून जाणे गरजेचे आहे. त्यामूळे चोहीबाजूने 22.5 सें.मी. X 15 सें.मी. आकाराची नाली असणे आवश्यक आहे.

सामुदायिक विज्ञान

वनामकृवि विकसित वांगी मोजा व भेंडी मोजा भाजी तोडणी कार्यातील शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयूक्त आहे.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक79/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 31.12.2021

 

Monday 27 December 2021

जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक २८ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सें. ने वाढ होण्याची शक्यता आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे वेचणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.उशीरा पेरणी केलेल्या तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्राम किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली  किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फल्यूबँडामाइड 20% 5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकावर शेंगा माशी चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 8 मिली  किंवा ल्यूफेन्युरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या (वेळेवर पेरणी केलेल्या व लवकर पक्व  होणाऱ्या वाणांची) तूर पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकात पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे केळी बागेत झाडांना काठीने आधार द्यावा, बागेतील वाळलेली व रोगट पाने काढून नष्ट करावीत.  आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी.   द्राक्ष बागेत डाउनी मिल्डयूच्या व्यवस्थापनासाठी आमिसूलब्रोन 17.7% एससी 0.38 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ग्राम प्रति लिटर किंवा मॅडीप्रोपॅमीड 23.4% एससी 0.8 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करावी.

भाजीपाला

जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेलया भाजीपाला पिकाची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेलया कांदा (रांगडा) पिकाची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. 

फुलशेती

जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावे. मेंढयांमध्ये यकृतकृमी व ॲम्फीसटोमस या पर्णकृमी जन्य आजारांचा प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. यामूळे प्रसंगी मेंढयांचा मृत्यू ओढवतो. सतत हगवण, गळयाखाली सूज, मलूल बनणे इत्यादी लक्षणे आढळल्यास मेंढयांची विष्ठा तपासून घ्यावी. विशेषत: ज्या मेंढया तळे, ओढा, नाला व इतर साचलेल्या पाण्याच्या काठच्या गवतावर चारल्या जातात अथवा अशा ठिकाणचे पाणी पितात त्यांच्यामध्ये हमखास लागण होते., म्हणून अशा आजाराची लागण झाल्यास मेंढयांना चरण्यासाठी इतरत्र हलवावे. अशा  ठिकाणचे पाणी पिण्यास वर्ज करावे तसेच त्यांना पशूवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली नेहमी देतो त्यापेक्ष वेगळया जंतनाशक औषधाची मात्रा द्यावी. मेंढयांना इतर सूश्रूषा जसे की यकृत टॉनिक्स ईत्यादी द्यावे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक 28 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.  

सामुदायिक विज्ञान

शेतीतील हाताने करावयाचे खत पेरणी कार्य सुकर करण्यासाठी वनामकृवि  विकसित सुलभा बॅगचा उपयोग करण्यात यावा.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक78 / 2021 - 2022    मंगळवार, दिनांक – 28.12.2021

Thursday 23 December 2021

दिनांक 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 28  डिसेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  

तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेलया तूर पिकाची काढणी व कापूस पिकाची वेचणी करावी व मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 डिसेंबर 2021 ते 04 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकास मुकूट मुळे फुटणे म्हणजेच पेरणी नंतर 18 ते 21 दिवसांनी पाणी द्यावे. रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. रब्बी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे व तूडतूडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची  किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% (संयूक्त किटकनाशक) 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.   उशीरा लागवड केलेल्या हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार (मे-जून) तोडणीस तयार असलेल्या फळांची तोडणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

 

भाजीपाला

भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या फुलपिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावे, तसेच त्यांना थंडीपासून संरक्षणासाठी कोरडी/उबदार जागेची व्यवस्था करावी. हिवाळयात जनावरांना उर्जेची गरज भागविण्यासाठी नियमितपणे जनावरांना खारटमिश्रणासह मिठ व गव्हाचे धान्य, गूळ इत्यादी 10 ते 20 टक्के प्रति दिवस द्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कीटक संगोपनासाठी तापमान व आर्द्रता मर्यादित ठेवणे गरजेचे असून यशस्वी कोष उत्पादनात संगोपन गृहातील हवामानाचा 36 टक्के वाटा आहे. तुती पानाचा वाटा 40 टक्के असून हिवाळयात रॅकवर निळे पॉलीथीन अच्छादन टाकावे. तापमान वाढीसाठी कोळशाची शेगडीचा (धूर रहित) किंवा रूम हिटरचा वापर करावा. 20 अं.सें. पेक्षा कमी किंवा 35 अं.सें.पेक्षा जास्त तापमानात रेशीम कीटकांची शरीरक्रिया मंदावते व खाद्य बंद होते त्यामूळे कच्या शेडनेट गृहास हळूहळू पक्या आरसीसी संगोपन गृहात बदलणे आवश्यक आहे.

सामुदायिक विज्ञान

वनामकृवि विकसित वांगी मोजा व भेंडी मोजा भाजी तोडणी कार्यातील शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयूक्त आहे.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक77/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 24.12.2021

 

Monday 20 December 2021

मराठवाडयात पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 डिसेंबर ते 01 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी सूर्यफूल पिकात पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्या किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून  बागेस सकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. बागेभोवती कृत्रिम वारा रोधकाची व्यवस्था करावी.  आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    किमान तापमानात झालेल्या घटीमूळे सकाळी थंडी वाढल्यास द्राक्ष बागेत मण्यांचे क्रॅकींग होऊ शकते. द्राक्ष बागेतील मणी तडकू नये म्हणून बागेत पाण्याचे समायोजन योग्य करावे.  किमान तापमानात झालेल्या घटीमूळे संत्रा/मोसंबी बागेत मूळांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते त्यामूळे बागेत 13:00:45 किंव 00:00:50 15 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. मेंढयांमध्ये यकृतकृमी व ॲम्फीसटोमस या पर्णकृमी जन्य आजारांचा प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. यामूळे प्रसंगी मेंढयांचा मृत्यू ओढवतो. सतत हगवण, गळयाखाली सूज, मलूल बनणे इत्यादी लक्षणे आढळल्यास मेंढयांची विष्ठा तपासून घ्यावी. विशेषत: ज्या मेंढया तळे, ओढा, नाला व इतर साचलेल्या पाण्याच्या काठच्या गवतावर चारल्या जातात अथवा अशा ठिकाणचे पाणी पितात त्यांच्यामध्ये हमखास लागण होते., म्हणून अशा आजाराची लागण झाल्यास मेंढयांना चरण्यासाठी इतरत्र हलवावे. अशा  ठिकाणचे पाणी पिण्यास वर्ज करावे तसेच त्यांना पशूवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली नेहमी देतो त्यापेक्ष वेगळया जंतनाशक औषधाची मात्रा द्यावी. मेंढयांना इतर सूश्रूषा जसे की यकृत टॉनिक्स ईत्यादी द्यावे. 

सामुदायिक विज्ञान

वनामकृवि विकसित टिकाई बॅगचा वापर करून गलांडा फुले तोडले असता कामगारांचा कामाच वेग व कार्यक्षमता वाढते, तर वेळेचाभार तसेच फुले तोडणी करतांना जाणवणारे श्रम हे लक्षणीय रित्या कमी होतात.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक76 / 2021 - 2022     मंगळवार, दिनांक – 21.12.2021