हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 जून रोजी लातूर व
धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक
राहून मूसळधार ते खूप मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 जून रोजी बीड व
नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची
शक्यता आहे. दिनांक 25 जून रोजी परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 26 जून रोजी
बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 जून रोजी
छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना,
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 27 जून रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव
जिल्हयात तर दिनांक 28 व 29 जून रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 25 ते 29 जून दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात कमाल
तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 25 जून ते 01 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी तर
दिनांक 02 जूलै ते 08 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयातील नांदेड जिल्हयातील
मुखेड तालूक्यातील (बऱ्हाळी व मुक्रामाबाद); किनवट : (शिवनी) ; लातूर जिल्हयातील अहमदपूर तालूक्यातील (हडोळती) ; जळकोट तालूक्यातील (जळकोट) ;
हिंगोली जिल्हयातील हिंगोली
तालूक्यातील (सिरसम, बासंबा, माळहिवरा) ; औंढा तालूक्यातील (औंढा व जवळा बाजार) ; जालना जिल्हयातील जालना
तालूक्यातील (जालना शहर, विरेगाव, रामनगर, पंचनवडगाव) अंबड तालूक्यातील (धनगर
पिंपरी) परतूर तालूक्यातील (श्रिष्टी) ; छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील छत्रपती संभाजी नगर तालूक्यातील
(कांचनवाडी, काचनर, पंढरपूर) पैठण
तालूक्यातील आडूळ, बालानगर) गंगापूर तालूक्यातील (मांजरी, जामगाव) सिल्लोड
तालूक्यातील (सिल्लोड, भार्डी, आमठाण, बोरगाव, अंभाई) सोयगाव तालूक्यातील (सोयगाव)
इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल
मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
संदेश : शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी
करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो
पालाश + 20 किलो ग्रॅम गंधक खताची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. सोयाबीन पिकाची
पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा
सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत
होऊन अधिक उत्पादन मिळते. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिन 37.5 % + थायरम 37.5 % (मिश्र घटक)
या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन 2.5 टक्के + थायोफॅनेट मिथाईल
11.25 टक्के + थायोमिथॉक्झाम 25 टक्के एफ एस 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बिजप्रक्रियेनंतर थायामिथोक्झाम 30% एफएस 10 मिली प्रति किलो ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी. वरील
बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद
विरघळविणारे जिवाणू खताची (पी.एस.बी.) 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 100 मिली/10
किलो ग्रॅम (द्रवरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी व नंतर बियाणे सावलीमध्ये
वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बिजप्रक्रियेसाठी व.ना.म.कृ. वि. परभणी
निर्मित द्रवरूप जैविक खताचा (रायझोफॉस) 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात
वापर करता येतो.
खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति
हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण
पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. खरीप
ज्वारीच्या पेरणीपूर्वी गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम 75 टक्के 3 ग्रॅम प्रति
किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच इमिडाक्लोप्रीड 48 टक्के एफएस 14
मिली किंवा थायमिथॉक्झाम 30 टक्के 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) प्रत्येकी 25 ग्रॅम
प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी जमिनीत
60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे.
बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी
बियाण्यास मेटालॅक्झील 35 % एसडी 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. 250 ग्रॅम
ॲझोस्पिरीलम 10 किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी किंवा शेवटी ॲझोटोबॅक्टर व
स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे
याप्रमाणात बियाण्यावर बिजप्रक्रिया करून पेरणी करता येते.
ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली
प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सुरू ऊसाची पक्की
बांधणी केली नसल्यास ती करन घ्यावी व पक्की बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो
स्फुरद व 55 किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळद
लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली + कार्बेंडेझीम 50
टक्के 10 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली + डायथेन एम-45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून 100-120 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. बियाणे 10 ते 15 मिनिट
द्रावणात बूडवून ठेवावे. वनामकृवि, परभणी येथील बायोमिक्स 200 ग्रॅम किंवा 200
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.
हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा
प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश
असावा.
फळबागेचे व्यवस्थापन
अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेमध्ये फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 1.5
ग्रॅम + 00:00:50 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची
खरेदी करावी.
नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची
खरेदी करावी.
नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची
खरेदी करावी.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. बी टाकलेल्या
गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. पाण्याची
उपलब्धता असल्यास व जमिनीत ओलावा पाहून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या
उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असल्यास व जमिनीत ओलावा पाहून फुल पिकाची
पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या
फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव
वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी
खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व
गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी,
गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात
दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून
काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात
जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 25/2026-2027 गुरूवार,
दिनांक –
25.06.2026
No comments:
Post a Comment