Tuesday, 30 September 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 02 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 03 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर व 01 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 02 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मागील दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज पाहता, पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. फवारणी व आळवणीची कामे जमिनीत वापसा व पावसाची उघाड बघून करावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास 200 ग्रॅम युरिया+ 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत )+25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. कापूस पिकात आंतरिक बोंड सड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% - 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब 70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सोयाबीन पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. परिपक्कव अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकात दीर्घकाळ ओलावा राहिल्याने दाणे कुजतात आणि तपकिरी होतात. तसेच  पिक वारंवार ओल्या होऊन कोरडे  होत राहिल्यास शेंगा तुटणे, फुटणे असा समस्या होतात. प्रदीर्घ ओलाव्यामुळे कोंब फुटतात तर पिकाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या कमी होते. ढगाळ व दमट हवामानामूळे उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल 25.9 % -250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3 % + इपिक्साकोनाझोल 5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे.

तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

मूग/उडीद पिकाची मळणी राहिली असल्यास मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

मका पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. केळी बागेत केळी झाडांना माती लावावी व काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. केळी बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्यामूळे मूळकुज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगनाशकाची किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. केळी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास 00:52:34 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. केळी बागेत अतिरिक्त पाण्यामूळे पाने पिवळी दिसून येत असल्यास त्यासाठी 19:19:19 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

आंबा बागेत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आंबा फळ बागेत  किडीचा व रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत किटक नाशकाची व रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. द्राक्ष बागेत रोगग्रस्त पानांची विरळणी करावी. द्राक्ष बागेत रोगनाशकाची आळवणी करावी. मागील आठवडयात झालेल्या अधिक पावसामूळे ऑक्टोबर छाटणी पुढे ढकलावी.

सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. लागवड केलेल्या भाजीपाला पिकतील तूट भरून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक53/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 30.09.2025

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 02 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 03 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर व 01 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 02 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...