हवामान
सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 07 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना जिल्हयात तूरळक
ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर परभणी जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 07 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 08 ते 11
जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर किंचित वाढ
होण्याची शक्यता आहे.
सामान्य
सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 10 ते 16 जूलै
दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता
आहे.
मराठवाडयातील परभणी जिल्हयातील : पाथरी तालूक्यातील
(हदगाव) ; हिंगोली जिल्हयातील सेनगाव तालूक्यातील (पानकन्हेरगाव ; नांदेड जिल्हयातील भोकर तालूक्यातील (मातूर, किन्नी)
अर्धापूर तालूक्यातील (माळेगाव), नायगाव तालूक्यातील (नायगाव) ; जालना
जिल्हयातील अंबड तालूक्यातील (सुखापूरी) घनसावंगी तालूक्यातील (अंतरवली, रांजणी)
भोकरधन तालूक्यातील (सिपोरा, केदारखेडा) जाफ्राबाद तालूक्यातील (जाफ्राबाद) ; बीड जिल्हयतील
आष्टी तालूक्यातील (टाकळसिंघ, पिंपळा), धारूर तालूक्यातील (मोहखेड, अंजनदोह) ; छत्रपती संभाजी
नगर जिल्हयातील छत्रपती संभाजी नगर तालूक्यातील (चिखलठाण, शेकटा) वैजापूर
तालुक्यातील (लोणी, नागामंथन, बकतारा) खुलताबाद तालूक्यातील (बाजार) इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी
पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकरी बांधवांनी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी
करावी.
संदेश
: शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर
सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या
पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी जमा
करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच
करणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार
मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा,
द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार
मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
जमिनीत ओलावा व वापसा पाहून कापूस पिकाची लागवड करून घ्यावी.
कोरडवाहू बिटी कापूस पिकास 120:60:60 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति
हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 48 किलो नत्र, 60
किलो स्फुरद व 60 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. बागायती बिटी कापूस पिकास
150:75:75 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक
खतमात्रापैकी 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश लागवडीच्या वेळी
द्यावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून
आलेल्या कापूस पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जमिनीत वापसा
असताना कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.
जमिनीत ओलावा व वापसा पाहून तूर पिकाची पेरणी करून घ्यावी. तूर
पिकास 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा
पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते.
पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या तूर पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून
घ्यावीत. जमिनीत वापसा असताना तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.
पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या मुग/उडीद पिकात विरळणी व
नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जमिनीत वापसा असताना मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची
कामे करून घ्यावीत.
पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या भूईमूग पिकात विरळणी व नांग्या
भरणे ही कामे करून घ्यावीत. भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.
जमिनीत ओलावा व वापसा पाहून मका पिकाची पेरणी करून घ्यावी. मका
पिकास 150:75:75 किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक
खतमात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व
75 किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत
करता येते.
फळबागेचे
व्यवस्थापन
केळी बागेत आंतर मशागतीची
कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच
रोपांची खरेदी करावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा.
ढगाळ वातावरणामूळे आंबा बागेत पर्णगूच्छ रोगाची समस्या लक्षात
घेता, पावसाळ्यात आवश्यकतेनूसार दोन ते तीन वेळा रोगनाशकाची पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
द्राक्ष बागेत रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व शेंडा खूड करून
घ्यावी.
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी,
कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार
केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाउस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून
फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
ओलसर व दमट
वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते.
त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात :
जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची
काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठयामध्ये मूबलक
प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दूभत्या जनावराची कास
पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात
मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा,
हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 28/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
07.07.2026
No comments:
Post a Comment