Tuesday, 4 August 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 07 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 ऑगस्ट रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 06 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 07 ऑगस्ट रोजी परभणी, लातूर जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 05, 07 व 08 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 06 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकात, फळबागेत, भाजीपाल व फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 50 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा जमिनीत वापसा व ओलावा असतांना द्यावी. कापूस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. तूर पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.  तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

मुग/उडीद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भुईमूग पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. भूईमूग पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

मका पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मका पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या केळी बागेस 50:50:50 किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे. केळी बागेत जमिनीत वापसा असतांना आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. केळी बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. केळी बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आंबा बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्ये शेंडा खूडून घ्यावा. द्राक्ष बागेत बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

सिताफळ बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. 

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात उदभवणाऱ्या आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.विशेष शेळी व मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांची लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणे टाळावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक36/2026-2027    मंगळवार, दिनांक – 04.08.2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 07 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 ऑगस्ट रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 06 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 07 ऑगस्ट रोजी परभणी, लातूर जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 05, 07 व 08 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 06 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्...