Tuesday, 14 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 जूलै रोजी बीड जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी बीड, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 17 जूलै रोजी हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 जूलै रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 17 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 जूलै रोजी बीड, लातूर, धाराशिव नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 17 ते 23 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचिंत जास्त राहण्याची शक्यता आहे.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.

संदेश : शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

आवश्यकतेनूसार कापूस पिकात सुक्षम सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

आवश्यकतेनूसार तूर पिकात सुक्षम सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

आवश्यकतेनूसार मूग/उडीद पिकात सुक्षम सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

आवश्यकतेनूसार भुईमूग पिकात सुक्षम सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

आवश्यकतेनूसार मका पिकात सुक्षम सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा.

नविन लागवड केलेल्या आंबा बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

आवश्यकतेनूसार द्राक्ष बागेस पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

नविन लागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात उदभवणाऱ्या आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.विशेष शेळी व मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांची लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणे टाळावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक30/2026-2027    मंगळवार, दिनांक – 14.07.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 जूलै रोजी बीड जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी बीड, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 17 जूलै रोजी हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 जूलै रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 17 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 जूलै रोजी बीड, लातूर, धाराशिव नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...