Friday, 13 May 2022
दिनांक 13 मे रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही . दिनांक 13 मे रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो
अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय
छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या 50 व्या
वर्धापन दिनानिमित्त दिनांक 18 मे 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता सूवर्ण जयंती दिक्षांत सभागृह, विद्यार्थी कल्याण अधिकारी
कार्यालयाजवळ, वनामकृवि, परभणी येथे खरीप शेतकरी मेळावा व कृषि प्रदर्शनाचे आयोजन
करण्यात आले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात
दिनांक 18 ते 24
मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर
किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा
योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची
मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग
पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला
सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया
हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी
30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे हळदीची उघडयावर साठवण करू नये.
फळबागेचे व्यवस्थापन
सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत
फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही
याची दक्षता घ्यावी तसेच बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी
सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता
घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना
उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची
मर होणार नाही. काढणीस तयार असलेल्या आंबा
फळांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड
केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी
सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन
करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा तसेच काढणीस
तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून काढणी केलेल्या आंबा फळांची
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. आंबे बहार
डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली
करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.
भाजीपाला
भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार
नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी
सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज व
खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भेंडी पिकावरील मावा किडीच्या
व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रीड 20% एसपी 1.5 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% ईसी 23 मिली किंवा
इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल 2 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 2 ग्रॅम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नागअळीच्या व्यवस्थापनासाठी
सायंट्रानिलीप्रोल 10.26% ओडी 18 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात
लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार
द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही
याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.
चारा पिके
उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार
नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या चारापिकात सकाळी
किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
तुती रेशीम
उद्योग
किटक संगोपन गृहालगत 10 फुट अंतरावर
चारही बाजूने तुती वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी. त्यामूळे 5 अं. से. तापमान
कमी मदत मिळते. कच्च्या शेडनेट गृहातील तापमान 28 अं.से. च्यावर जाता कामा नये.
हिवाळयात 20 अं.से. च्या खाली व उन्हाळयात 35 अं.से. च्या वर तापमान गेल्यास रेशीम
किटक पाने खात नाहीत. तुती पाने खाण्याची क्रिया मंदावते. किटक उपाशी राहतात व
जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास बळी पडतात. त्यामूळे उन्हाळयात 3 ते 4 वेळा तुती
फांद्या खाद्य द्यावे व रॅकवर निळी नायलॉन जाळी किंवा निळी पॉलीथीन पट्टी आच्छादन
करावे. आतील चारही बाजूने 22.5X 15 सेंमी लांबी खोलीची नाली असावी. वरच्या बाजूस सिमेंट
पत्रे किंवा बेंगलोर टाईल्स टाकून त्यावर कोल्ड गार्ड पांढरा रंग द्यावा म्हणजे
तापमान 5 ते 7 अं.से ने कमी होते.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडुन सकाळी 11 ते दूपारी 4
या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी
चरण्यासाठी सोडावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात
भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर
ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास
झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
लोकरीचे कपडे साठवितांना कपाट/पेटी कडक
उन्हात वाळवून त्यामध्ये डांबराच्या गोळ्या किंवा कडू लिंबाच्या पानाचा वापर
करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 13/2022
- 2023 शुक्रवार, दिनांक – 13.05.2022
Tuesday, 10 May 2022
दिनांक 10 मे रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली तर दिनांक 11 मे रोजी लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील 2 ते 3 दिवस मराठवाडयात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 10 मे रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली तर दिनांक 11 मे रोजी लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 15 ते 21 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस
तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी
भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार
व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. तूरळक ठिकाणी हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग शेंगाची सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी. हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी
केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी
सोयाबीन पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी
हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन
पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे.
काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. नविन
लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण
बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन
पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व
लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड
निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते. नविन लागवड केलेल्या सीताफळ बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी
सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन
करावे.
भाजीपाला
कमाल तापमानात होत असलेल्या
वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला
पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज व खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भेंडी
पिकावरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रीड 20% एसपी 1.5 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% ईसी 23 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल 2 मिली
किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नागअळीच्या व्यवस्थापनासाठी
सायंट्रानिलीप्रोल 10.26% ओडी 18 मिली किंवा थायामिथॉक्झाम
25% डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या
कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
कमाल तापमानात होत असलेल्या
वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर
करावी.
पशुधन
व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4
यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सामुदायिक विज्ञान
संग्रहीत कपडे नेहमी
वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवावे. वर्तमान पत्राच्या शाईमूळे कपडयांना कसर लागत
नाही.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 12
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 10.05.2022
Friday, 6 May 2022
मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 08 ते 10 मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 08 ते 10 मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 11 ते 17 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे
तर किमान तापमान
सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन
पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत
असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन
लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.
फळबागेचे
व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या
आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा
ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी
व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून
संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार
नाही. कमाल तापमानात होत असलेल्या
वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी
व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी
सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबे बहार डाळींब
बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन
लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच
खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.
भाजीपाला
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज व खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भेंडी
पिकावरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रीड 20% एसपी 1.5 ग्रॅम किंवा
डायमिथोएट 30% ईसी 23 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8%
एसएल 2 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी
2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नागअळीच्या
व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलीप्रोल 10.26% ओडी 18 मिली किंवा
थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार
सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर
करावी.
चारा पिके
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी
हंगामासाठी लागवड केलेल्या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन
करावे.
तुती रेशीम
उद्योग
किटक संगोपन गृहालगत 10 फुट अंतरावर चारही
बाजूने तुती वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी. त्यामूळे 5 अं. से. तापमान कमी
मदत मिळते. कच्च्या शेडनेट गृहातील तापमान 28 अं.से. च्यावर जाता कामा नये.
हिवाळयात 20 अं.से. च्या खाली व उन्हाळयात 35 अं.से. च्या वर तापमान गेल्यास रेशीम
किटक पाने खात नाहीत. तुती पाने खाण्याची क्रिया मंदावते. किटक उपाशी राहतात व
जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास बळी पडतात. त्यामूळे उन्हाळयात 3 ते 4 वेळा तुती
फांद्या खाद्य द्यावे व रॅकवर निळी नायलॉन जाळी किंवा निळी पॉलीथीन पट्टी आच्छादन
करावे. आतील चारही बाजूने 22.5X 15 सेंमी लांबी खोलीची नाली असावी.
वरच्या बाजूस सिमेंट पत्रे किंवा बेंगलोर टाईल्स टाकून त्यावर कोल्ड गार्ड पांढरा
रंग द्यावा म्हणजे तापमान 5 ते 7 अं.से ने कमी होते.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडुन सकाळी 11 ते दूपारी 4
या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी
चरण्यासाठी सोडावे. पशुधनातील उत्पादनवाढीसाठी त्यांना होणारा गोचीड, गोमाशा, उवा,
पिसवा यांचा प्रादूर्भाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी उन्हाळा ऋतूमध्ये कडू
निंबाच्या वृक्षाच्या पूर्ण पिकून खाली पडलेल्या निंबोळ्या गोळा करून सावली मध्ये
वाळवून साठवून ठेवाव्यात व दर महिन्यामध्ये एकवेळ 5% निंबोळी अर्क करून पधुधनास फवारावे.
सामुदायिक विज्ञान
लोकरीचे कपडे साठवितांना कपाट/पेटी कडक
उन्हात वाळवून त्यामध्ये डांबराच्या गोळ्या किंवा कडू लिंबाच्या पानाचा वापर
करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 11/2022
- 2023 शुक्रवार, दिनांक – 06.05.2022
Monday, 2 May 2022
दिनांक 03 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 04 मे रोजी हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील 3 ते 5 दिवस कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.सें ने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 03 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 04 मे रोजी हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस
तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी
भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार
व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी. हळदीची काढणी,
हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे
करून घ्यावीत. सध्या
हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे हळदीची उघडयावर
साठवण करू नये. काढणीस
तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार
असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची काढणी लवकरात लवकर करावी व काढणी केलेल्या उन्हाळी
सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड
केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा तसेच बागेभोवती कृत्रिम वारा रोधकाची
व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड
केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार
नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने
सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा तसेच काढणीस
तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून काढणी केलेल्या आंबा फळांची
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड
निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते. वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून
तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान द्राक्ष वेलींना आधार द्यावा. नविन लागवड केलेल्या सीताफळ बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी
सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन
करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार
द्यावा.
भाजीपाला
भाजीपाला पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. भाजीपाला पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी
लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला,
टरबूज, खरबूज पिकाची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला,
टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला
पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.
फुलशेती
कमाल तापमानात होत असलेल्या
वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर
करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4
यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा
बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
ओलसर दमट कपडे घडी करून कपाटात
ठेवणे टाळावे, कारण असे केल्यास सुती कपडयांना बुरशी आणि कुबट वास येतो.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 10
/ 2022 - 2023 सोमवार, दिनांक – 02.05.2022
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी दक्षिण भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...


