Thursday, 10 February 2022

मराठवाडयात पूढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियस ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, व त्यानंतर चौथ्या व पाचव्या दिवशी किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियस ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, व त्यानंतर चौथ्या व पाचव्या दिवशी किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनितील ओलावा कमी झालेला असल्यामूळे पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी करून 80 ते 85 दिवस झाले असल्यास) पिकास पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी करून 20 ते 25 दिवस झाले असल्यास व पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास मायक्रोला आरसीएफ (ग्रेड-2) या सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 ते 75 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी ऊस पिकाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. डाळींब बागेत शॉर्ट होल बोरर/खोड किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास खोडांना लेप लावण्यासाठी लाल माती 4 किलो + क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून जमिनीपासून 2 ते 2.5 फुट खोडावर लेप लावावा. थाईमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 10 ते 15 ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 15 ते 20 मिली  प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून ड्रेनचींग करावी.

 

भाजीपाला

मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर मिरची, कांदे, टोमॅटो इत्यादी पिकांची रोपे तयार करावीत.

फुलशेती

गॅलार्डिया फुल पिकाची लागवड करावी. फुल पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटए नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग  किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

बाळाला वयाचया 6 महिन्यानंतरही मानेवर ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक91/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 11.02.2022

 

Monday, 7 February 2022

उत्तर मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियस ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार उत्तर मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियस ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनितील ओलावा कमी झालेला असल्यामूळे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 13 ते 19 फेब्रूवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हाळी भूईमूग पिकाची पेरणी केली नसल्यास लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी. उन्हाळी भुईमूग पिकास पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे नंतर द्रव्यरूपी रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) संवर्धके प्रत्येकी 10 मिली प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी सल्फर (40 एस.सी) या फॉर्म्यूलेशनचा 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापर करावा. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

गोचीडांचा पशुधनावर प्रचंड प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे एकात्मीक किड व्यवस्थापन कार्यक्षम राबवणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये गोठ्यातील सफाई करून अंडी शेकोटीमध्ये जाळणे, 5% निंबोळी अर्काची पशुधनावर फवारणी करणे व सदरील प्रक्रिया आठवडयाच्या अंतराने तिन वेळेस करावी.

सामुदायिक विज्ञान

बालविकासाला चालना देण्यासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टी जसे की वाळू, शंख, शिंपले, बिया, पाने, फुले, माती, काडया, खडे, गारगोट्या इ. सोबत बालक खेळत असतांना त्यांच्या विविध रचना करणे, वर्गीकरण करणे, लहान-मोठेपणा, हलके व जडपणा त्यांचे रंग, आकार याविषयी माहिती द्यावी.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक90 / 2021 – 2022   मंगळवार, दिनांक – 08.02.2022

 

Thursday, 3 February 2022

मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियस ने घट होऊन नंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियस ने घट होऊन नंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनितील ओलावा कमी झालेला असल्यामूळे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 फेब्रुवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे उशीरा पेरणी केलेल्या व फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकामध्ये फुल गळ होऊ शकते यासाठी फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकात 2% यूरीया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी करून 80 ते 85 दिवस झाले असल्यास) पिकास पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी सोयाबीन पिकास हलके पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी करून 20 ते 25 दिवस झाले असल्यास व पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास मायक्रोला आरसीएफ (ग्रेड-2) या सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 ते 75 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी ऊस पिकाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता संत्रा/मोसंबी बागेत खोडाभोवती अच्छादन करावे, बागेस संध्याकाळी पाणी द्यावे. बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  किमान व कमाल तापमानातील तफावतीमूळे डाळींब बागेत फळे तडकण्याचे (क्रॅकींग) प्रमाण वाढू शकते,क्रॅकींग टाळण्यासाठी बागेत पाण्याचे योग्य नियोजन करावे. बागेत थोडेथोडे आणि संध्याकाळी चार नंतर पाणी द्यावे यामूळे बागेतील थंडी कमी राहण्यास मदत होईल.

भाजीपाला

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास सायंकाळी पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता फुल पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फुलपिकास सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे.

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुतीबागेत केसाळ अळी (बिहार हेअरी केंटर पिलर) याचा प्रादुर्भाव हिवाळयात जाणवतो. पानांवर पुंजक्यात 200 ते 300 अळया अंडयातुन फुटून बाहेर येतात व पानांवर उपजिवीका करतात यामुळे पानांची चळणी झालेली दिसते. याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशक न फवारता भौतीक पध्दतीने म्हणजे हाताने प्रादुर्भावग्रस्त पाने तोडावेत व अळया रॉकेलमध्ये बुडवून नियंत्रण करावे.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामुदायिक विज्ञान

बालक जेव्हा अपेक्षेप्रमाणे चांगली कृति करतात, तेव्हा पालकांनी त्यांचे लगेच कौतूक करावे. म्हणजे पुन्हा पुन्हा चांगल्या कृती करण्यास बालकास प्रेरणा ‍मिळते.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक89/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 04.02.2022

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 सप्टेंबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, लातूर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी तर ‍दिनांक 11 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील तीन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...