प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार
ते खूप जोरदार तर हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी
वादळी वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 ऑगस्ट रोजी औरंगाबाद
जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी
जोरदार पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 22 ऑगस्ट ते 28
ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात सहा किंवा आठ ओळीनंतर जलसंधारण
सरी काढावी. ढगाळ वातावरण असल्यामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव
वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य
किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बूप्रोफेंझीन 25%
400 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम प्रति एकर दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास
फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी
बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची
शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.तूर
पिकात प्रत्येक ओळीत जलसंधारण सरी काढावी. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावरील पाने गुंडाळणारी
अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार
पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा
करावा.ढगाळ
वातावरण यामुळे मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास
फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर
पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.ढगाळ वातावरणामूळे भूईमूग पिकात मावा,
फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस
25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन
5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर
पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा
सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची
शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी पिकात ढगाळ वातावरण व आर्द्रतेमूळे
करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम
50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून स्टीकरसह दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार
ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत साचलेल्या अतिरीक्त
पाण्याचा निचरा करावा.आंबा बागेत तणांचे व्यवस्थापन करावे. तूरळक ठिकाणी जोरदार ते
खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा
निचरा करावा.सध्याचे ढगाळ वातावरण, आर्द्रता व पावसामूळे द्राक्ष बागेत केवडा (डाउनी
मिल्डू) रोगाच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस 4 ग्रॅम + मॅन्कोझेब
2 ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत
साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तूरळक
ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर बागेत साचलेल्या
अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.
भाजीपाला
सध्याच्या दमट व ढगाळ वातावरणामूळे
टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2%
+ डायफेनकोनॅझोल
11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला
( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण
करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाने उघाड दिल्यास
फवारणी
करावी. तूरळक
ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात
साचलेल्या अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.
फुलशेती
ढगाळ वातावरणामूळे गुलाब फुलपिकावरील रसशोषण
करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची दोन दिवसानंतर पावसाने उघाड
दिल्यास फवारणी करावी. तूरळक ठिकाणी जोरदार
ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर पिकात साचलेल्या अतिरीक्त
पाण्याचा निचरा करावा.
पशुधन
व्यवस्थापन
पावसाळाऋतूमध्ये लोखंड सदृश अखाद्य वस्तू
पशुधनाकडून खाद्याबरोबर गिळल्या जाते व यामूळे पोटफुगी संभवते याचे निदान करण्यासाठी
पशूशल्य्चिकीत्साशास्त्र विभाग, पशू चिकीत्सालय संकुल पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय
येथे अद्यावत क्ष-किरण तपासणी सुविधा उपलब्ध् करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी या सुविधेचा
लाभ घ्यावा. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह जोरदार ते खूप जोरदार पावसाची
शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू
किंवा बांधू नये. निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी
तसेच पाऊस चालू होण्याच्यावेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदासिक विज्ञान
पावसाळयात पचनक्रिया मंदावल्याने अन्नाचे
पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी यासाठी पावसाळयात पचनास हलका, ताजा आणि गरम आहार
घ्यावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 40 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 17.08.2021
No comments:
Post a Comment