प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 सप्टेंबर
ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान
सरासरीएवढे राहण्याची,
किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर
पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पावसामूळे कापूस पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. कापूस पिकात जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% 25 ग्रॅम + स्ट्रेपटोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात आकस्मिक मर विकृतीचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत
शेताबाहेर काढून द्यावे वापसा येताच लवकरात लवकर 1.5 किलो यूरीया + 1.5 किलो पालाश (पोटॅश) + 250
ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 100 लिटर
पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 150 मिली आळवणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल 5% 30 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7% 8 मिली किंवा बूप्रोफेंझीन
25% 20 मिली किंवा फलोनिकॅमिड
50% 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. कापूस पिकात फुलगळ दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथेलीन ॲसिटीक ॲसिड (एन ए ए ) 2.5 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. पावसामूळे तूर पिकात
साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर
काढून द्यावे वापसा येताच लवकरात लवकर मेटालॅक्झील 4% +
मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी
25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावार पावसाने
उघाड दिल्यास फवारणी करावी.पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मुग/उडीद पिकाची मळणी करावी
व मळणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.पावसामूळे भूईमूग पिकात
साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.पावसामूळे मका पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
पावसामूळे केळी बागेत साचलेले अतिरीक्त
पाणी बागेबाहेर काढून द्यावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम
50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल
10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. पावसामूळे आंबा बागेत साचलेले
अतिरीक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.पावसामूळे द्राक्ष बागेत साचलेले अतिरीक्त
पाणी बागेबाहेर काढून द्यावे. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने व फांद्या गोळा करून
नष्ट कराव्यात. द्राक्ष बागेत ऑक्टोंबर छाटणीची पूर्व तयारी करावी.पावसामूळे
सिताफळ बागेत साचलेले अतिरीक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम
लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
भाजीपाला
पावसामूळे भाजीपाला पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. भेंडी पिकावरील फळपोखरणाऱ्या अळीच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एस सी 2.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 25%
ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास
फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत
पाठवावीत.
फुलशेती
पावसामूळे फुल पिकात साचलेले अतिरीक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे. सध्या गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक
मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व प्रतवारी
करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गारवर्गीय
व म्हैसवर्गीय पशूधनात दिसून येत आहे. हा साथीचा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार
मूख्यत्वे रक्त पिपासू चावणऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यामूळे होतो. याच्या
व्यवस्थापनासाठी रोग बाधीत पशुधन निरोगी
पशुधनापासून विलगीकरण करावे अथवा त्यांना एकत्रित चरावयास सोडू नये. रोगबाधीत
पशुधनाची ने आण बंद करावी. तसेच साथीच्या काळात गावातून/परिसरातून गोठयास भेटी
देणाऱ्याची संख्या मर्यादीत करावी. बाधीत पशुधनाची सुश्रुषा करणाऱ्य पशुवैद्यक
डाफक्टरांनी विशिष्ट पोशाख परिधान करावा व सुश्रूषेनंतर हात अल्कोहोत मिश्रीत
सॅनीटायझरने धूवून टाकावेत तसेच पादत्राने व पोशाख, गरम पाण्याने निर्जंतूक करून
घ्यावा. बाधीत पशुधनाच्या संपर्कामध्ये आलेले वाहन व परिसर तसेच ईतर साहीत्य निर्जंतूक करावे. रोग
नियंत्रणासाठी रक्त पिपासू चावणाऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यांचे निर्मुलन
करावे. पशुधन व परिसरावरती रासायनिक/वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.
सामुदासिक विज्ञान
पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा,
स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके,
दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 48 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 14.09.2021
No comments:
Post a Comment