Tuesday, 21 September 2021

दिनांक 21 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच दिनांक 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूढील पाच दिवसात जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात हलका ते मध्यम तर औरंगाबाद व नांदेड जिल्हयात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच दिनांक 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूढील पाच दिवसात जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात हलका ते मध्यम तर औरंगाबाद व नांदेड जिल्हयात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कापूस पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तूर पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या मुग/उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता भूईमूग पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भूईमूग पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता मका पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मका पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. केळी बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता आंबा बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

भाजीपाला

पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.

फुलशेती

पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये. पशूधनाचे शिंग बुडापाशी नरम पडणे, वाकडे होणे, शिंग वारंवार घासणे, खाजवणे, शिंगाला छिद्र पडणे किंवा शिंगामधून घाण वास/द्रव येणे. ही वरील लक्षणे शिंगाच्या कर्करोगाची असून तात्काळ पशूवैद्यक तंज्ञाकडून शल्यचिकीत्सा करून घ्यावी.

सामुदासिक विज्ञान

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ लाभदायी असल्याने पालकांनी त्यांना यासाठी प्रोत्साहीत करावे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक50/ 2021 - 2022    मंगळवार, दिनांक – 21.09.2021

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...