Friday, 17 September 2021

दिनांक 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2021 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्हयात खूप हलका ते हलक्या तर औरंगाबाद, जालना, परभणी, जिल्हयात हलक्या स्वरूपाचा तर नांदेड व हिंगोली जिल्हयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील पानावरील ठिपके व शेंगा करपाच्या व्यवस्थापनासाठी टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 25 ग्राम प्रति 10 लिटर पाणी किंवा टेब्यूकोनॅझोल  25.9% 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन  पिकावरील उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड  39.35 एससी 3 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 15.8 एससी 3 मिली किंवा थायमिथोक्झाम  12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.   फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास 00:00:50 15 ग्रॅम प्रति  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जर बागेत अधीपासूनच तेलकट डाग रोगाचा प्रादूर्भाव असेल तर स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10% (स्ट्रेप्टोसायक्लीन) 0.5 गॉम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि त्यानंतर 7-10 दिवसाच्या अंतराने ब्रोनोपॉल फवारावे. तेलकट डागाच्या जिवाणूमध्ये 0.5 ग्राम प्रति लिटरपेक्षा कमी मात्रेला प्रतिकार शक्ती निर्माण झाल्यामूळे शिफारशीपेक्षा कमी मात्रा वापरून फवारणी केल्यास रोग नियंत्रणात येत नाही.  चिकू बागेत तणांचे व्यवस्थापन करावे.

 भाजीपाला

भेंडी पिकावरील फळपोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एस सी 2.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

फुलशेती

गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर 100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी. पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.

सामुदायिक विज्ञान

बालकांच्या डोळयात काजळ घालणे हानिकारक असल्याने कुटुंबियांनी त्याचा वापर करणे टाळावे.

 

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक49 / 2021 - 2022   शुक्रवार, दिनांक 17.09.2021

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...