प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक
01 ऑक्टोबर
रोजी हिंगोली, जालना, औरंगाबाद, बीड व परभणी जिल्हयात तर दिनांक 02 ऑक्टोबर रोजी
परभणी, बीड, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 03 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना,
परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली,
परभणी व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी
वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान
सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे
कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे. कापूस पिकात सध्या अंतरीक बोंड सड व बाह्य बोंड सड
याचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. अंतरीक बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर
ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसेच
बाह्य बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी
25 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे सोयाबीन
पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील पानावरील ठिपके व
शेंगा करपाच्या व्यवस्थापनासाठी टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी
+ सल्फर 65% डब्ल्यूजी 25 ग्राम प्रति 10 लिटर पाणी किंवा
टेब्यूकोनॅझोल 25.9% 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील
काही दिवसात झालेल्या पावसामूळे तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. तुर पिकात
फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात
साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून द्यावे वापसा येताच लवकरात लवकर
मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
खोडाभोवती आळवणी व खोडावार पावसाची उघाड बघून स फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे ऊस पिकात
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे हळद पिकात पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे. हळदीच्या पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन
18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे
स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे
केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी
10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेल्या
पावसामूळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत
साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीचा
कालावधी लांबवावा.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे संत्रा/मोसंबी बागेत पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे डाळींब बागेत पाणी साचून
राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
भाजीपाला
मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे
भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले
अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिक पिवळे
पडत असल्यास पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून द्यावे वापसा
येताच लवकरात लवकर कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
आळवणी करावी. भेंडी पिकावरील फळपोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एस सी 2.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 25%
ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे
फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व
प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
तुती रेशीम उद्योग
कोष तयार झाल्यानंतर पाचव्या किंवा
सहाव्या दिवशी कोष काढणी करून लगेच बाजारात विक्री करणे गरजेचे आहे. दहाव्या
दिवसापर्यंत थांबू नये, नाहीतर कोषात पतंग तयार होऊन कोषास छिद्र पाडून बाहेर पडतो
आणि कोषास कमी भाव लागतो. कोषाची 4 ते 6 महीने साठवणूक करणे शक्य आहे, पण त्यासाठी
कोष काढणीनंतर लगेच ते कडक उन्हात 5 दिवस वाळवणे आवश्यक आहे (70 अंश सेल्सिअस
तापमान 5 तास बिओडीमध्ये ठेवावेत). ज्या ठिकाणी कोषाची साठवणूक करावयाची आहे तेथे
डेल्टामेथ्रीन 0.028% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नाहीतर
तेथे लाल भुंगेरे (ईमीस्टीड बिटल) चा प्रादूर्भाव होतो व कोषातील शंखी कोषास छिद्र
पाडून खातात.
सामुदायिक विज्ञान
त्रिशुळ विळा: वनामकृवि विकससित त्रिशुळ
विळयाला असलेल्या लांब दांडयामूळे दोन्ही हातांनी निंदणी करता येते आणि शारीरिक
संस्थिती सुधारते. या विळयाला असलेल्या दूधारी पात्यामूळे काम दुप्पट होते, तसेच
हा विळा वजनाला हलका आणि काम करण्यास सोपा
असून कामाची गती वाढते. त्यामूळे शेतिकामामध्ये त्रिशुळ विळा वापरावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 53 / 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक 01.10.2021
No comments:
Post a Comment