Thursday, 2 December 2021

दिनांक 03 डिसेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर दिनांक 04 डिसेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 डिसेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर दिनांक 04 डिसेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील 2 दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 08 डिसेंबर ते 14 डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सध्याचे ढगाळ, दमट वातावरण व अधून मधून पडत असलेल्या पावसामूळे वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.उशीरा बागायती गहू पिकाची पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा बागायती गहू पिकाच्या पेरणीसाठी निफाड-34, पीबीएन-142 (कैलास), एचडी-2501, एचडी-2833 या वाणांची निवड करावी. उशीरा बागायती गहू पिकाच्या पेरणीसाठी 80:40:40 किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची शिफारस आहे त्यापैकी पेरणी वेळी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी.सध्याचे ढगाळ, दमट वातावरण व अधून मधून पडत असलेल्या पावसामूळे रब्बी भुईमूग पिकात मावा, फुलकिडे व तूडतूडे यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाड बघून 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.  सध्याचे ढगाळ, दमट वातावरण व अधून मधून पडत असलेल्या पावसामूळे हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्याचे ढगाळ, दमट वातावरण व अधून मधून पडत असलेल्या पावसामूळे लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.सध्याचे ढगाळ, दमट वातावरण व अधून मधून पडत असलेल्या पावसामूळे डाळिंब पिकात तेलकट डाग रोगाचा (तेल्या) प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यवस्थापनासाठी 7 ते 10 दिवसाच्या अंतराने बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. त्यानंतर स्ट्रेप्टोसायक्लिन 100% (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट आय पी 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड आय पी 10%) 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 2-ब्रोमो, 2-नायट्रो प्रोपेन-1, 3 डायओल (ब्रोनोपोल 95% ) 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी + कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्साईड 2.0-2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी + स्प्रेडर स्टिकर 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

सध्याचे ढगाळ, दमट वातावरण व अधून मधून पडत असलेल्या पावसामूळे भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पूर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकात तूट भरून काढावी. सध्याच्या दमट व ढगाळ वातावरणामूळे टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या फुलपिकात तूट भरून काढावी.

चारा पिके

रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या चारा पिकांत तण व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

हिवाळयात पावसाळी ढगाळ हवामानात रेशीम किटक संगोपन गृहातील आर्द्रता 85% च्या वर म्हणजे 100% होते. अळयांची चौथी कात अवस्था संपल्यानंतर दूसऱ्या दिवशी सकाळी रॅकवर आर्द्रता कमी होण्यासाठी चोही बाजूने शेडनेट वरती करून हवा खेळती ठेवावी. रॅकवर पांढरा चूना पावडरची धूरळणी करावी. शंभर अंडी पूंजांसाठी 15 किलो ग्रॅम चून्याची पावडर 5-7दिवसात आवश्यकतेनूसार धूरळणी केल्यास रॅकवरील फांद्याखाद्य व त्यासोबत किटकाची असणारी विष्टा निर्जंतूक होण्यास मदत होत. रोग प्रादूर्भाव (मस्करडाइन) खडू रोग प्रादूर्भाव होत नाही. शंभर अंडी पूंजांसाठी विजेता किंवा अंकूश 4.5 किग्रॅ पावडर गरजेचे असते.

सामुदायिक विज्ञान

कौटूंबिक जिवनात प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी समस्येचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक71/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 03.12.2021

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 व 15 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...