प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार दिवसात हळूहळू किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने घट
होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर
पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
हरभरा पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20
पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन
बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5%
3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकास मुकूट मुळे फुटणे म्हणजेच पेरणी
नंतर 18 ते 21 दिवसांनी पाणी द्यावे. रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. रब्बी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे व तूडतूडे)
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा
सायहॅलोथ्रीन 9.5% (संयूक्त किटकनाशक) 3 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली
प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या
व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा
डायमिथोएट 30 % 10 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे
व्यवस्थापन
लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा
प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30%
ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळ
तोडणीसाठी तयार असलेल्या डाळींब बागेत फळांवरील बूरशीजन्य रोग नियंत्रणासाठी सल्फर
80% डब्ल्यूपी 2.5 ग्राम किंवा कॉपरयूक्त (तांबे) बूरशीनाशक
2 ते 3 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या चिकू
फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. कोबी वर्गीय भाजीपाला पिकात पानावरील बूर्शीजन्य ठिपके रोगाच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 1.0 ते 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या फुलपिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
चारा पिके
रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या चारा
पिकांत तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
तुती रेशीम
उद्योग
उझी माशीचा संगोपन गृहात प्रादूर्भाव
होऊ नये म्हणून संगोपन गृह चोही बाजूने, वरील पत्रे व शेडनेट सील करावे. सर्व
प्रथम तुती फांद्या कापून शेतातून सरळ संगोपन गृहात आणण्याचे बंद करावे. पाने
साठवण्यासाठी अंधार खोलीची व्यवस्था करावी तेथे फांद्या उभ्या ठेवून पानावरची धूळ
स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा फवारा किंवा फॉगर ची व्यवस्था करावी. अंधार खोली तसेच
संगोपनगृहातील फवारणी केलेले दूषित पाणी बाहेर निघून जाण्यासाठी चोही बाजूने 22.5 सेंमी X 15 सेंमी रूंदीच्या नालीची व्यवस्था असावी. 100% निर्जंतूकीकरण
होण्यासाठी दोन कोषाच्या पिकात 8 दिवसाचे अंतर ठेवणे व त्या काळात 3 ते 4 वेळा
आलटून पालटून ब्लिचिंग पावडर 0.2% 200 ग्राम +30 ग्राम चुना
पावडर पाण्यासोबत मिश्रण करून फवारणी करावी. नंतर अस्त्र निर्जंतूक 50 ग्राम + 100
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सामुदायिक विज्ञान
वनामकृवि विकसित कापूस वेचणी कोटाच्या
वापरामूळे शेतकरी महिलांचे कापूस वेचणी या कामातील कष्ट व शारीरिक धोके कमी होतात,
तसेच त्यांना उन्हापासून संरक्षण मिळते व कापसाची स्वच्छ वेचणी करता येते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 75/2021 - 2022 शुक्रवार, दिनांक – 17.12.2021
No comments:
Post a Comment