प्रादेशिक हवामान
केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 24
तासात किमान तापमानात फारशी
तफावत जाणवणार नाही. त्यानंतर नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात किमान
तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर
पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकावरील
गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस
40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त
किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी. कुठल्याही परिस्थितीत
कापसाची फरदड (खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस
पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. ढगाळ
वातावरणामूळे तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन
बेन्झोएट 5% 4.4 ग्राम किंवा स्पिनोसॅड
45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब
14.5% 8 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फल्यूबँडामाइड 20% 5 ग्राम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर
पिकावर शेंगा माशी चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा
सायहॅलोथ्रीन 5% 8 मिली
किंवा ल्यूफेन्युरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब
64% डब्ल्यूपी 25
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावार फवारणी करावी. वेळेवर
पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +
लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. ढगाळ वातावरणामूळे वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत झाडांना काठीने आधार
द्यावा, बागेतील वाळलेली व रोगट पाने काढून नष्ट करावीत. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या
व्यवस्थापनासाठी बुप्रोफेंजीन 25% एससी 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25%
डब्ल्यूजी 2 ग्राम किंवा
डेल्टामेथ्रीन 2.8% ईसी 0.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष
बागेत जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएम ची दूसरी फवारणी करावी.
भाजीपाला
कोबी वर्गीय भाजीपाला पिकात पानावरील
बूर्शीजन्य ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 1.0 ते 1.5 ग्राम प्रति
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला
पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची,
वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा
डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी
करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुधन व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे
संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे
लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.
सामुदायिक विज्ञान
फुलेरी बास्केट व गौरी बॅग सुटा व
गट्टी गुलाबाची फुले तोडतांना वापरली तर कामाचा वेग 16-33 टक्क्यांनी वाढतो व फुले
तोडणी कार्यासाठी लागणारा कामगारांचा वेळेचाभार कमी होतो. फुले तोडणी करतांना
जाणवणारे श्रम हे लक्षणीय रित्या कमी होतात. त्यामूळे वनामकृवि विकसित फुलेरी बास्केट
व गौरी बॅगचा उपयोग गुलाबाची फुले (सुटी व गट्टी) तोडतांना करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 72
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 07.12.2021
No comments:
Post a Comment