Monday, 10 January 2022

दिनांक 11 जानेवारी रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.  दिनांक 11 जानेवारी रोजी नांदेड जिल्हयात  तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे परंतू  पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देणे गरजेचे आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  जमिनीतील ओलावा कमी झाल्यास व पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हाळी भुईमूगाच्या लागवडीसाठी टॅग-24, टी.जी.-26, टीएलजी-45, टीजी-51, टीपीजी-41, टीजी-37, एलजीएन-2 किंवा एसबी-11 या वाणांची निवड करावी. बागायती करडई पीक फुलावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये  पिकास हलके पाणी द्यावे तसेच पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

ढगाळ वातावरण, आर्द्रता यामूळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    काढणीस वेळ असलेल्या द्राक्ष बागेत डाऊनी मिल्डयूच्या व्यवस्थापनासाठी ॲमिसूलब्रुम 17.5 % एससी 0.375 मिली किंवा फ्युयोपिकोलाईड 4.44% + फोसेटिल एएल 66.67% संयूक्त बूरशीनाशक 2.5 ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ते 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्षाची घडे जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएमच्या द्रावणात बूडवावी.

भाजीपाला

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे भाजीपाला (कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी) पिकावर ‍रोगव्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

सध्या पशूधनामध्ये एफ एम डी  (लाळ्या खुरकुत) या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. बाधित प्राण्यामध्ये उच्च ताप, संपूर्ण अंगावर पुरळ येऊन फुटतात, विशेष करून नाका तोंडात व खुरांवर पुरळ जास्त प्रमाणात आढळतात, तसेच  नैराश्य, अतिउत्साहीपणा, भूक न लागणे, वजन कमी होणे, वाढ मंद होणे आणि दूध उत्पादनात घट दिसून येते, जी बरे झाल्यानंतरही कायम राहू शकते. याच्या व्यवस्थापनासाठी एफ एम डी बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे केल्यास रोगाचा प्रसार रोखता येईल. लसीकरणामुळे रोग होण्यास प्रतिबंध होतो. जनावरांचे लसीकरण सुरुवातीला 3 महिन्यांच्या वयात करावे आणि नंतर बूस्टर लसीकरण दरवर्षी करणे आवश्यक आहे. थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. कोंबडयाच्या शेडमध्ये आवश्यकतेनूसार ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत.

सामुदायिक विज्ञान

वनामकृवि विकसित वांगी मोजा व भेंडी मोजा भाजी तोडणी कार्यातील शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयूक्त आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक82 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 11.01.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी,नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे तर लातूर जिल्हयात वादळी वारासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यात हलक्या पाऊसाची शक्यता आहे. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...