Thursday, 13 January 2022

दिनांक 14 व 15 जानेवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात  पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पूढील चार दिवस किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 व 15 जानेवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात  तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 ते 25 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे गहू पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन 10 ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.   उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी केली नसल्यास लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी जास्तीत जास्त 15 जानेवारी पर्यंत करता येते. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  फळ तोडणीसाठी तयार असलेल्या डाळींब बागेत ढगाळ वातावरणामूळे फळांवरील बूरशीजन्य रोग नियंत्रणासाठी सल्फर 80% डब्ल्यूपी 2.5 ग्राम किंवा कॉपरयूक्त (तांबे) बूरशीनाशक 2 ते 3 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे भाजीपाला (कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी) पिकावर ‍रोगव्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

सध्या मकर संक्रांत या सणामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते व दरही चांगले मिळतात. बाजारपेठेचा अंदाज लक्षात घेऊन फुलांची तोडणी टप्याटप्याने करावी.

 

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी पासून जूनमध्ये पहिली छाटणी 1.25 फुट उंच जमीनीपासून करावी. पहिल्या वर्षात एकच झाड ठेवणे नंतर बाजूचे फुटवे 1.25 फुट उंची पर्यंत येऊ देऊ नयेत. फुटव्यांना कोवळा पाला लागतो व कोवळया तुती पाल्यात रेशीम कीटकास आवश्यक असलेले अन्नघटक प्रथीने, कार्बोहायड्रेट व शर्करेचे प्रमाण कमी असते. त्याच बरोबर कोवळया पानावर तुडतुडे, फुलकिडंयाचा प्रादुर्भाव होतो. याउलट प्रोढ कीटकांना परिपक्व तुती पानांची आवश्यकता असते म्हणून एका ठिकाणी एकच झाड ठेवावे.

सामुदायिक विज्ञान

दूधामधील कॅल्शियम हाडांसाठी तर प्रथिने हे स्नायूंच्या बळकटी करणाकरिता आवश्यक आहे. सकाळी दुध घेतल्यानंतर दिवसभर ताजे वाटते. दुधामध्ये झींक आणि विटामीन डी असल्यामूळे दुधास रोग प्रतिकार शक्ती वाढवीणारे अन्न असे समजले जाते.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक83/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 14.01.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...