Thursday 17 February 2022

मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान व कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान व कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार परभणी जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे व इतर जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. परभणी जिल्हयातील मानवत, पूर्णा, सेलू व जिंतूर तालूक्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर इतर तालूक्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.  उन्हाळी सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करावीत व पिकास पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी करून 20 ते 25 दिवस झाले असल्यास व पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास मायक्रोला आरसीएफ (ग्रेड-2) या सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 ते 75 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस पाणी द्यावे. डाळींब बागेत शॉर्ट होल बोरर/खोड किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास खोडांना लेप लावण्यासाठी लाल माती 4 किलो + क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून जमिनीपासून 2 ते 2.5 फुट खोडावर लेप लावावा. थाईमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 10 ते 15 ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 15 ते 20 मिली  प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून ड्रेनचींग करावी.

 

भाजीपाला

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर मिरची, कांदे, टोमॅटो इत्यादी पिकांची रोपे तयार करावीत.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम कोषाचा ए-ग्रेड उत्त्म प्रकारे मिळवण्यासाठी किटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे आवश्य्‍क आहे. खाद्य म्हणून तुती पानात पाण्याचे प्रमाण 80 टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत 6 ते 7 दिवसाला तर भारी जमीनीत 10-12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात. खत मात्रा; वर्षातून कंम्पोस्ट खत 2 वेळा जुन व नोत्हेंबर महिण्यात 4 टन प्रत्येकी (एकूण 8 टन एकरी) द्यावे म्हणजे वर्षाकाठी एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते. दुस-या वर्षापासून 250 अंडिपूजाची 5 ते 6 पीके घेणे शक्य होते. 200 कि. ग्रा. कोषाच्या उत्पन्नास रू. 300/- प्रति किलो भाव ‍मिळला तरी 60,000/- प्रमाणे 5 पिकाचे रू. 3 लक्ष उत्पन्न शेतक-याला मिळते.

सामुदायिक विज्ञान

बाळाला वयाचया 6 महिन्यानंतरही मानेवर ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक93/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 18.02.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...