Tuesday 22 March 2022

मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 3 ते 4 दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 3 ते 4 दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 मार्च ते 02 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त तर किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.  कापणीस तयार असलेलया करडईची कापणी करावी. कापणी सकाळी करावी म्‍हणजे हातांना काटे टोचत नाहीत आणि बोंडातील दाणेही गळत नाहीत; तसेच हातांना काटे टोचु नये म्‍हणून कपडा किंवा हातमोजे वापरावेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या गुलाब, मोगरा, जिलारडिया फुलांची काढणी करून घ्यावी. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता फुलपिकात पाणी व्यवस्थापन करावे.

 

 

पशुधन व्यवस्थापन

पिसवांचा पशुधनास होणारा प्रादुर्भाव ही एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून त्यांच्या नियंत्रणासाठी त्रिसुत्रीचा वापर आवश्यक आहे. एक म्हणजे पशुधनास काही कालावधीसाठी नियमीत गोठ्यापासून दुर अंतरावर ठेवणे. नियमीत गोठा आठवडयाच्या अंतराने छतापासून जमीनीपर्यंत साफ करून 4% मीठाच्या द्रावणाने फवारणेव तिसरे म्हणजे पिसवांची लागण झालेल्या पशुधनास वनस्पतीजन्य/रासायनीक किटकनाशकाची फवारणी पशुवैद्यक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे. उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक102 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 22.03.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...