Friday, 8 April 2022

मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात पुढील दोन ते तिन दिवस दूपारच्या वेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात पुढील दोन ते तिन दिवस दूपारच्या वेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 13 एप्रिल ते 19 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मळणी केलेल्या हरभरा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  काढणी केलेलया गहू पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत.  कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम तसेच 13:00:45 1.5 किलो  प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. डाळींब फळबागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून 13:00:45 1.5 किलो  प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही.

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

पट्टा पध्दत तुती लागवड 5X3X2 फुट किंवा 6X3X2 फुट अंतरावर असेल तर सेंद्रिय पदार्थाचे किंवा काळे पॉलीथीन अच्छादन उन्हाळयात पाण्याचे बाष्पीभवन रोकण्यासाठी महत्वाचे ठरते. फेब्रुवारी मार्च महिन्यात एक एकर साठी दोन गुंठे क्षेत्रावर तुती रोप वाटीका केली तर वरच्या बाजूस शेडनेट (हिरवे 70%) खाली तुती बेने लावले तर मुळे फुटण्यास मदत होते. बेने मरण्याचे प्रमाण कमी होते पट्टा पध्दत तुती लागवडीत सेंद्रिय पध्दतीने उसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन काड, गवत इत्यादी आच्छादन म्हणून वापरल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयुक्त ठरते. काळे पॉलीथीन आच्छादनामूळे सूर्यप्रकाश जमिनीच्या आत शिरत नाही व तण बीज अंकूरण होत नाही म्हणून तण उगवत नाही व आपोआप तण नियंत्रण मिळते व निंदणीच्या खर्चात बचत होते. 90 सें.मी. दोन ओळीत एक 20 मिमी ठिबक लॅटरल टाकली तर झाडे जगण्याचे प्रमाण वाढते. आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य होते. द्रवरूप खते देणे सोयीचे होते.

सामुदायिक विज्ञान

संसर्गजन्य व्याधीने आजारी असलेल्या व्यक्तींचे कपडे काढल्याबरोबर त्वरीत ते डेटॉल मिश्रित पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये टाकावे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक03/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 08.04.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 05 ते 07 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...