Friday 27 May 2022

दिनांक 30 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 30 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ते 07 जून, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन  पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तिन वर्षात एकदा खोल (30 ते 45 सें.मी.) नांगरणी करावी. नांगरणीनंतर दोन ते तिन वखराच्या पाळया देऊन जमिन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 20 गाडया (5 टन) शेणखत किंवा कंपोस्टखत जमिनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी पेरणीसाठी एकदा नांगरणी करून 3 ते 4 वखराच्या पाळया देऊन जमिनीची मशागत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 10 ते 15 गाडया चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. बाजरीच्या पेरणीसाठी जमिनीची नांगरट करावी व वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळीपूर्वी हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची उन्हाळयात खोल नांगरट करून जमिन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कूळवाच्या उभ्या-आडव्या पाळयानंतर सपाटीकरण करावे. दूसऱ्या नांगरणीपूर्वी अडसाली लागवडीसाठी प्रति हेक्टरी 25 टन शेणखत जमिनीत ‍मिसळावे. हळद लागवडीसाठी जमिनीची ट्रॅक्टरने 18 ते 22 सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. नांगरटीनंतर शेतातील तणांचे अवशेष वेचून जाळून नष्ट करावेत. नांगरीनंतर कुळवणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून घ्यावीत आणि चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी 1X1X1 मीटर या आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 3 ते 4 घमेली शेणखत किंवा कंपोस्टखत व पोयटा माती यांनी खड्डे भरून घ्यावे.  डाळिंब लागवडीसाठी घेतलेले खड्डे चांगली माती + चांगले कुजलेले व रापलेले शेणखत + 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + पालापाचोळा यांनी जमिनीपासून वर 15 ते 20 सेंमी खड्डे भरून घ्यावेत व मधोमध एक बांबूची काठी लावावी.  चिकू लागवडीसाठी घेतलेले 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 1:3 या प्रमाणात शेणखत + माती या मिश्रणाने खड्डे भरावे.

भाजीपाला

टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी जमिन खोलवर नांगरून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावेत.  काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी फुलपिकानूसार जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा पिकाच्या लागवडीसाठी एक नांगरट करून दोन ते तिन वेळा वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत हेक्टरी 20 ते 25 टन कंपोस्ट खत मिसळावे.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

तुती रेशीम उद्योग

उस, कापूस पिकाच्या तूलनेत तुती लागवड कमी पाण्यात होत असून एक वेळा लागवड केली तर 15 ते 20 वर्ष पून्हा पून्हा लागवड करायची आवश्यकता भासत नाही. मजुरांच्या वाढलेल्या मजुरी मूळे व उपलब्धतेमूळे उस व कापूस पीक पध्दती अडचणीची झाली असताना लहान शेतकऱ्यांने 1.5 ते 2 एकर क्षेत्रावर तुती लागवड करावी. व्हि-1 जातीचे बेणे जून महिण्यात 2 गुंठे क्षेत्रावर गादी वाफे करून लावले तर तिन महिण्यानीं तुती रोपे ऑगस्ट-सप्टेंबर शेतात लावावी. 3 महिण्यांनी पहिले कोषाचे पीक सुरूवात होते. दूसऱ्या वर्षापासून कोषाचे 4 ते 5 पिके निघतात.

सामुदायिक विज्ञान

स्वयंपाकघरात खोलीचे तापमान जास्त असते त्यामुळे या खोलीच्या  भिंतींना थंड रंग द्यावेत उदा. निळा, हिरवा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक17/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 27.05.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...