Tuesday, 7 June 2022

दिनांक 07 जून रोजी बीड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 09 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.सें ने घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 07 जून रोजी बीड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 09 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग मागील आठवडयाच्या तूलनेत कमी झालेला आहे.

विस्तारीत (ईआरएफएस) अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 12 जून ते 18 जून, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार दिनांक 12 ते 18 जून , 2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा  विचार करून वाणांची निवड करावी. तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716,  बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), विपूला, फुले राजेश्वरी, एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा. मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद  लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. भुईमूग  पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  इत्यादी वाणांचा वापर करावा. मका  पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड केलेल्या बागेत आं मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत. नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आं मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी जेणेकरून बागेत वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही. वेळेवर छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी. नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आं मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे.  तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे.  तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामुदायिक विज्ञान

घरातील खोल्या लहान असतील तर भिंतीना फिका रंग द्यावा त्यामूळे खोली मोठी असल्याचा आभास  निर्माण होईल. गडद रंगामुळे खोली अधिक लहान वाटते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक20 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 07.06.2022

 

 

 

No comments:

Post a Comment