Tuesday, 12 July 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 जुलै रोजी औरंगाबाद, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची तर जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 जुलै रोजी औरंगाबाद, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 जुलै रोजी औरंगाबाद, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची तर जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 जुलै रोजी औरंगाबाद, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेले आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागांमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन व कापूस यांसारख्या पिकांमध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रतिझाड 10 ग्रॅम पसरून टाकावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) राठवाड्यात दिनांक 17 जुलै ते 23 जू, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर 0.5 % (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) फेरस सल्फेटची  पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड (II) 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील तुर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील मूग/उडीद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मूग/उडीद पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.जास्त पाऊस झालेल्या भागातील भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भुईमूग पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.जास्त पाऊस झालेल्या भागातील मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी मका पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मका पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील केळी, आंबा, सिताफळ, द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.

भाजीपाला

जास्त पाऊस झालेल्या भागातील भजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटीकेतील रोपांना बुरशी नाशकाची  आळवणी करावी.

फुलशेती

जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

जनावरे शक्यतो बाहेर चारावयास नेऊ नयेत. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. पोल्ट्री पक्षी पक्क्या शेड मध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक30 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 12.07.2022

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 05 ते 07 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...