Tuesday 26 July 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 26 जुलै रोजी नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर हिंगोली व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 व 28 जुलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे. 

मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 31 जुलै ते 07 ऑगस्ट, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. कापूस पिकात मर किंवा मूळकुज दिसून येत असल्यास जमिनीत वापसा आल्यानंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.  पाऊस झालेल्या भागातील तुर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. तसेच जिथे मर रोगाची सुरूवात होत असल्यास जमिनीत वापसा आल्यानंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. पाऊस झालेल्या भागातील मूग/उडीद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मुग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 13 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मूग/उडीद पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाऊस झालेल्या भागातील भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भुईमूग पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाऊस झालेल्या भागातील मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. केळी बागेत रोगनाशकाची आळवणी करावी. द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष  बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.

भाजीपाला

सध्या ढगाळ वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयामध्ये पशुधनामध्ये घटसर्प हा विषाणूजन्य आजार एक घातक रोग आहे. या रोगामधील फुफुसाचा दाह (न्यूमोनिया) हा प्रकार जिवघेणा ठरतो. जनावरे अचानक आजारी पडणे, नाकावाटे श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे प्रामूख्याने आढळतात. वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावण्याची भिती असते. मात्र पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची वेळी मात्रा दिल्यास हा रोग बरा होतो. हा रोग होऊच नये म्हणून आपल्या जनावरांचे लसीकरण करता येईल.

सामूदायीक विज्ञान

पारंपारिक पध्दतीन कपडे धुताना कपडयांना साबण लावणे, घासणे इ. क्रिया बसुन केल्या तर गुडघ्यांवर आणि पायांवर येणारा ताण कमी होऊ शकतो. पारंपारिक पध्दतीने कपडे धुताना मधून मधून बसण्यासाठी स्टुलचा  वापर केल्यास शारिरीक श्रम कमी पडतात.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक34 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 26.07.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...