Monday, 8 August 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार तर लातूर, बीड, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार ते खुप मुसळधार तर जालना, औरंगाबाद, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे. 

मराठवाडयात दिनांक 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस, तूर, मूग/उडीद, भुईमूग व मका पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर केळी  व सिताफळ बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. बागेत फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीचा आधार द्यावा. तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर दाक्ष बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. बागेत फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

 

 

भाजीपाला

तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या भाजीपाला पिकांना काठीचा आधार द्यावा.

फुलशेती

तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या फुल पिकांना काठीचा आधार द्यावा.

पशुधन व्यवस्थापन

तुरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामूदायीक विज्ञान

पारंपारिक पध्दतीन कपडे धुताना ते थोडा वेळ डिटर्जन्टमध्ये बुडवून ठेवल्यास कपडे धुण्याच्या वेळेत आणि श्रमात बचत होते. तसेच कपडे स्वच्छ धुतल्या जातात. पारंपारिक पध्दतीने कपडे धुण्यासाठी  कपडे धुण्याची जागा सावलीत असेल तर वातावरणातील कमी उष्णतेमूळे कपडे धुणाऱ्या व्यक्तीस थकवा कमी जाणवतो.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक38 / 2022 - 2023    सोमवार, दिनांक – 08.08.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...