सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग कमी झालेला आहे.
मागील आठवडयात
झालेल्या पावसामूळे पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकात साठलेल्या पाण्याचा त्वरीत निचरा करावा.
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 सप्टेंबर
दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे कापूस पिकात साठलेल्या पाण्याचा
त्वरीत निचरा करावा. कापूस पिकात आकस्मिक
मर चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पाण्याचा
लवकरात लवकर निचरा करावा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर 200
ग्रॅम युरिया + 100 ग्रॅम पालाश + 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 150 मिली या प्रमाणे आळवणी करावी किंवा 1
किलो 13:00:45 + 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड
+ 250 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 200 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड
100 मिली आळवणी करावी. मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे सोयाबीन पिकात साठलेल्या पाण्याचा त्वरीत
निचरा करावा. सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे सोयाबीन पिकात रोगाचा
प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया
एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250
मिली किंवा
पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा
पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची
उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारावे. मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे
तुर पिकात साठलेल्या पाण्याचा त्वरीत
निचरा करावा. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी
5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर
करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात
भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. मागील
आठवडयात झालेल्या पावसामूळे हळद पिकात साठलेल्या पाण्याचा त्वरीत निचरा करावा. मागील आठवडयात झालेल पाऊस,
आर्द्रता व ढगाळ वातावरणामूळे हळदीच्या पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी
अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर
फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने
क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा
आल्यानंतर फवारणी करावी. उघडे पडलेले कंद
मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम
नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे द्राक्ष बागेत साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा त्वरीत निचरा करावा. द्राक्ष बागेत पानांची विरळणी
करावी व शेंडा खुडावा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी
थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी
करावी. द्राक्ष बागेत जिवाणूजन्य करपा
नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व
जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे डाळींब
बागेत साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा
त्वरीत निचरा करावा. डाळींब बागेत ढगाळ
वातावरण व आर्द्रतेमुळे रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5% किंवा
कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर
किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर +
स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा
आल्यानंतर फवारणी करावी. मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे संत्रा/मोसंबी बागेत
साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा त्वरीत निचरा करावा. पावसामूळे संत्रा / मोसंबी बागेत
पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. मागील
आठवडयात झालेल्या पावसामूळे सिताफळ बागेत साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा त्वरीत निचरा करावा. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा
प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी
40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत
वापसा आल्यानंतर फवारणी करावी.
भाजीपाला
मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे भाजीपाला पिकात साठलेल्या
पाण्याचा त्वरीत निचरा करावा. सध्या ढगाळ
वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. भाजीपाला
(मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% +
फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा
याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. मिरची पिकावरील मर
(ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे फुल पिकात साठलेल्या पाण्याचा
त्वरीत निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन
व्यवस्थापन
लम्पी स्कीन रोग
याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या
एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही
प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो. याच्या नियंत्रणासाठी सर्व साधारणपणे
1.पशुधनास प्रखर उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात
ठेवावे) 2. शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून
टाकावा.3. गोठयात स्वच्छता ठेवावी 4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या
अंतराने 5% निम सिड कर्नल
एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम
तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी हे द्रावण फवारावे.5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी
गोळा करून शेकोटीमध्ये जाळावी.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 48
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 13.09.2022
No comments:
Post a Comment