Tuesday 20 September 2022

मराठवाडयात दिनांक 20 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 20 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात; दिनांक21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर तूर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणी केलेल्या मुग/उडीदाच्या शेंगा सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मुग/उडीदाच्या शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत रब्बी भुईमूग  पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते. रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर केळी बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.  पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर द्राक्ष बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी व शेंडा खुडावा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष  बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करावी. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर सिताफळ बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो. याच्या नियंत्रणासाठी सर्व साधारणपणे 1.पशुधनास प्रखर उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे) 2. शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.3. गोठयात स्वच्छता ठेवावी 4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी हे द्रावण फवारावे.5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावी. 6. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. 7. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामूदायीक विज्ञान

बालविकासाकरिता बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक पातळीस अनुसरून मनोरंकरित्या बडबडगीते व गाणी म्हणासवयास लावा. कारण विविध गाण्यातून बालकांचा शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती विकसित होते. इतरांसमोर गाणी गायल्यामूळे आत्मविश्वास वाढुन त्यांची व्यक्तिमत्व विकासास मदत होते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक50/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 20.09.2022

 


No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...