दिनांक 08 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 ऑक्टोबर रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, जालना, बीड व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 14 ते 20
ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 12 ते 18 ऑक्टोबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे
तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून
ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही
याची दक्षता घ्यावी. सोयाबीन पिकाची काढणी पुढे ढकलावी. पुढील पाच दिवसाचा पावसाचा
अंदाज लक्षात घेता काढणी केलेले खरीप ज्वारी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा
ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात
भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. खरीप ज्वारी पिकाच्या कणसांची काढणी पुढे ढकलावी.
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले बाजरी पिकाची कणसे गोळा
करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले
कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजरी पिकाच्या कणसांची काढणी
पुढे ढकलावी. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर ऊस
पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते
शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. पुढील पाच
दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर हळद पिकात वापसा स्थिती
निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची
व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. हरभरा पिकाच्या पेरणीसाठी
बीडीएनजी-9-3, बीडीएनजी-797 (आकाश), दिग्विजय, जाकी-9218, साकी-9516, फुले विक्रम,
फुले विक्रांत, पीडीकेव्ही कांचन, विश्वास इत्यादी वाणांपैकी निवड करावी. करडई
पिकाच्या पेरणीसाठी शारदा, परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40
(निम काटेरी), अन्नेगीरी-1, एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी
निवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत वापसा स्थिती
निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची
व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी,
डाळींब व चिकू झाडांना काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी
शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात
लवकर करून घ्यावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना काठीचा आधार द्यावा.
चारा पिके
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर चारा पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात
अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची
कामे पुढे ढकलावीत.
फुलशेती
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात
घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त
पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे
ढकलावीत.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम कोषाचे पिक यशस्वी होण्यासाठी
दोन महत्वाच्या बाबी आहेत. पानाची प्रतिभा 38% वाटा असून 37% कीटक संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादीत ठेवणे हे होय.
मराठवाडयातील बिड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हयातील काही शेतकऱ्यांनी जोड ओळ
पध्दत 5X3X1 सरी पध्दत 4X1 फुट अशा चुक
पध्दतिने लागवड केली आहे. तीन वर्षानंतर जमीनीतून क्षार, पाणी, हवा व सुर्यप्रकाश
घेण्यासाठी स्पर्धा निर्माण होते व पानांची प्रत खलावते. अशा पानात पाण्याचे व
क्षार, प्रथीनांचे प्रमाण योग्य राहत नाही. किटक रोगास लवकर बळी पडतात. त्यामूळे 6X3X2
फुट जोड ओळ पध्दतीने किंवा 5X3X2 फुट अंतरावर
लागवड करावी.
पशुधन
व्यवस्थापन
लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग पशूधनात
दिसून येत आहे. कारणे: या
रोगाचा संसर्ग "कॅप्रीपॉक्स" (Capri pox) विषाणू मुळे होतो. हा
विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे.पशुपालकांनी
घ्यावयाची काळजी : बाधित
जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात
प्रवेशास बंदी करणे. रोग
प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित
सोडण्यास मनाई करणे. डास,
गोचिड व तत्सम किड्यांच्या बंदोबस्त करणे. तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये
यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव
नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंधक करणे. प्रतिबंधात्मक
उपाय योजना : तत्काळ
नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास
जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार औषध मलम
लावावे. लम्पी या
त्वचा रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोट पॉक्स या लसीचे लसीकरण करून
घ्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये.
निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक
विज्ञान
पीक कापणी आणि मळणी करतांना
शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा
होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे,
श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक
वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा,
कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 55/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
07.10.2022
No comments:
Post a Comment