मराठवाडयात दिनांक 14 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी
झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 ऑक्टोबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे
तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा
क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5%
निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य
किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन
5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित
किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी
हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या
वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा
प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75%
400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. पुढील
दोन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून
शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन
पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची
स्वच्छ हवामानात काढणी करावी. तूर
पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5%
निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शक्य असेल
तेथे तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या
खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगांची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते.
पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो
बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. रब्बी ज्वारी पिकाची
पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. पेरणी 45X15
सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे.
परेणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. रब्बी सुर्यफुलाची पेरणी ऑक्टोबर
महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. पेरणी संकरीत वाणासाठी 60X30 सेंमी तर सुधारित वाणासाठी 45X15 सेंमी अंतरावर
करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी फळ पिकावरील करपा (सिगाटोका) रोगाच्या व्यवस्थापनासाठी
मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन
5% डब्ल्यू जी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. बागेत प्रति झाड 50 ग्रॅम नत्र व 50 ग्रॅम पालाश खत मात्रा
द्यावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीचे
नियोजन करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी
तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला
मिरची पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 50% डब्ल्यूपी 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल 25%
5 मिली किंवा मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी
10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो
पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय
भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी लिकॅनीसिलीयम लिकॅनी
(जैविक बुरशीजन्य किटकनाशक) 40 मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन
5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13
मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी
करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन
व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा
प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या
किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त
हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास,
या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक
पध्दतीने प्रसारीत करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व
टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व
शेणाचा खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित
करणे. ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची
फवारणी करणे. टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर
सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते. अ) पशुधनास प्रखर
सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात
ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी
घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. ब) या माशा देखील
प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून
पशुधनास चरावयास सोडावे.
सामूदायीक विज्ञान
पीक कापणी आणि मळणी करतांना शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना
तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर
अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे, श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी
पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा
टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर
करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 56/
2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 11.10.2022
No comments:
Post a Comment