Friday 21 October 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्हयात ; दिनांक 22 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 व 23 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या त मध्यम तर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

मराठवाडयात दिनांक 21  ते 27 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर दिनांक 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणी केलेले सोयाबीन वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले खरीप ज्वारी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणी  केलेले कणसे वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले दाण्यांची साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले बाजरी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणी  केलेले कणसे वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले दाण्यांची साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हळदीवर करपा, पानावरील ठिपके, कंदकुज आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).  कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडयापर्यंत संपवावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 10 नोव्हेंबर पर्यंत करता येते. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश (109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 54.25 किलो युरिया + 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X 10 सेंमी अंतरावर करावी. कोरडवाहू करडई पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडयापर्यंत संपवावी. बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व  30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे (पेरणीच्या वेळी 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 31 किलो युरिया किंवा 65 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी द्यावे व पेरणी नंतर एक महीन्यानी 65 किलो युरिया द्यावा).  पेरणी 45X 20 सेंमी अंतरावर करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत पानामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 2 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  डाळींब बागेत  एक टक्का बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी.

भाजीपाला

पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

 

फुलशेती

पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पुढील आठवडयात येणाऱ्या दिवाळी सणामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते त्यानुसार टप्प्याटप्प्याने बागेतील फुलांच्या तोडणीचे नियोजन करावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक थंड रक्ताचा किटक असून संगोपनगृहातील तापमान 20 सें.ग्रे. च्या खाली व 35 सें. ग्रे. च्या वर गेले असता तुती पाने खात नाहीत. हवामानाच्या बदलल्या ढगाळ वातावरणात संगोपनगृहात तापमापी व आर्द्रता यंत्र (ईलेक्ट्रानिक) असणे गरजेचे आहे. तापमान व आर्द्रतेचया अंदाज न आल्यामूळे खडू रोग, ग्रासरी किंवा फ्रॅचरी रोग प्रादूर्भाव रेशीम किटकास जाणवतो. दोन कोषाच्या पिकात 8 दिवसाचे अंतर ठेवावे व या काळात ब्लिचिंग पावडर 2 टक्के व कळीचा चुना 0.3 टक्के या प्रमाणे 100 लिटर पाण्यात 200 ग्रॅम ब्लिचिंग पावडर व 300 ग्रॅम चुना वापरावा नंतर 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यात अस्त्रची फवारणी 48 तासानंतर करावी.

पशुधन व्यवस्थापन

अनेक मार्गाने लम्पी स्कीन डिसीजच्या विषाणूचा प्रसार होतो. त्यापैकी एक म्हणजे चावा घेऊन रक्त शोषण करणाऱ्या किटकवर्गी माशा व गोचीडे होत, परंतू काही शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार घरगूती माशा (चावा न घेणाऱ्या) देखील या विषाणूचा प्रसार करून शकतात. यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (1) गोठ्यामध्ये पडणारी रोगी पशुची लाळ, नाकातील स्त्राव यांचे व एकंदरीत गोठयाचे निर्जंतमकीकरण दैनंदिन करणे या निर्जंतूकिकरणासाठी खालील द्रावण वापरावीत. (अ) 1 टक्के फॉरमेलीन द्रावण अथवा(ब) 2 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावण अथवा (क) 3 टक्के फेनाल/फिनाईल द्रावण या तीन पैकी एक द्रावण गोठयात फवारावे. हे द्रावण पशुच्या शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच फवारणी नंतर अर्धातास पशुधनास गोठयामध्ये जाऊ देवू नये. (2)गोठयामध्ये व परिसरामध्ये निर्जंतूकीकरणासोबतच ठरावी कालांतराने वनस्पतीजन्य/रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चतम दर्जाची गोठयाची स्वच्छता राखावी. 

सामुदायिक विज्ञान

दोन टक्के आवळ्याच्या पानाच्या अर्काचा वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्हया सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ प्रतिबंधित करता येते. आवळ्याच्या पानाच्या अर्कासह 6% सीट्रिक ॲसिड घेऊन  सुती कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा  प्रतिबंध कापडाच्या पाच धुण्यानंतर कमी झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्ट्यपूर्ण कपडयांना उदा. अवगुठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पट्टया यावर केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक59/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 21.10.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...